नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यासाठी अनेक नावांवर चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षानं सर्व 70 जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केल्यानंतर, अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला भावी मुख्यमंत्री घोषित केलंय. केजरीवाल यांच्यापुढे कायदेशीर अडचणी असल्यानं आतिशी यांचंही नाव पुढं आलं आहे. दुसरीकडं भाजपानं 29 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी मुख्यमंत्री पदासाठी माजी खासदार बांसुरी स्वराज आणि मनोज तिवारी यांच्या नावांची चर्चा आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव आणि नवी दिल्ली मतदारसंघाचे उमेदवार संदीप दीक्षित हेही स्पर्धेत आहेत.
आप, काँग्रेस आणि भाजपाची रणनीती : काँग्रेस, भाजपा आणि आम आदमी पक्षानं दिल्ली निवडणुकीसाठी आपापली रणनीती तयार केली आहे. आम आदमी पक्षातील केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि त्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसनं विचारपूर्वक रणनीती आखली आहे. काँग्रेसनं दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना नवी दिल्लीच्या जागेवर केजरीवाल यांच्या विरोधात उमेदवारी दिली. त्याचबरोबर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र माजी खासदार प्रवेश वर्मा यांना भाजपानं तिकीट दिलंय. दोन्ही नेत्यांनी निवडणूक प्रचारालाही सुरुवात केली आहे. दरम्यान, मनीष सिसोदिया यांना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसनं पक्षाचे ज्येष्ठ नेते फरहाद सूरी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं आतापर्यंत 48 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
आतिशी मुख्यमंत्री झाल्यामुळं कालकाजी ही जागा हायप्रोफाईल जागा ठरली आहे. त्यामुळं काँग्रेसनं चांदणी चौक मतदारसंघातून आमदार असलेल्या अलका लांबा यांना कालकाजी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर भाजपानं आतिशी यांच्या विरोधात तुघलकाबाद मतदारसंघातून तीन वेळा आमदार आणि दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेले रमेश विधुरी यांना उमेदवारी दिली आहे. तर नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार केजरीवाल यांच्या विरोधात भाजपानं माजी खासदार प्रवेश वर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
संभाव्य उमेदवार