महाराष्ट्र

maharashtra

पुण्यातील एमएसएमई डिफेन्स एक्स्पोमध्ये 1,200 संरक्षण कंपन्या सहभागी होणार, जाणून घ्या सविस्तर

By ANI

Published : Feb 4, 2024, 9:12 PM IST

MSME Defence Expo : भारतीय संरक्षण दल संरक्षण संशोधन आणि विकास संघटना मध्यम आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं पुणे येथे आयोजित महाराष्ट्र संरक्षण प्रदर्शनात घेणार आहेत. दरम्यान, हे प्रदर्शन 17-19 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

over 1200 defence companies to participate in maharashtra msme defence expo in pune
पुण्यातील एमएसएमई डिफेन्स एक्स्पोमध्ये 1,200 संरक्षण कंपन्या सहभागी होणार

नवी दिल्ली MSME Defence Expo in Pune :भारतीय संरक्षण दल संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) या दोन्ही संघटना मध्यम आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे येथे 17-19 फेब्रुवारी दरम्यान आयोजित महाराष्ट्र संरक्षण प्रदर्शनात भाग घेणार आहेत. दरम्यान, हे प्रदर्शन पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे संरक्षण फर्म निबे लिमिटेडच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.

या एक्स्पोचे उद्दिष्ट काय? :या प्रदर्शनासंदर्भात अधिक माहिती देत राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी म्हंटलंय की, "मध्यम आणि लघु उद्योगांचा मोठा सहभाग असलेल्या या प्रदर्शनाचे उद्दिष्ट किनारपट्टीच्या राज्याला संरक्षण उत्पादनाचे केंद्र म्हणून चालना देण्याचं आहे." तसंच महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या संख्येने संरक्षण PSUs, DRDO प्रयोगशाळा (पुणे येथे मुख्यालय) आणि आयुध निर्माणी आहेत, तसेच 12,500 MSMEs च्या मजबूत नेटवर्कसह देशातील संरक्षण परिसंस्थेमध्ये योगदान आहे. उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेते, नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप आणि डायनॅमिक एमएसएमई यांना त्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी, सहकार्याला चालना देण्यासाठी आणि संरक्षण क्षेत्रातील अफाट क्षमतांना अनलॉक करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

10,000 विद्यार्थी होणार सहभागी :दरम्यान, या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध विद्यापीठं आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांतील अंदाजे 10,000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, विद्यार्थ्यांना ट्राय-सर्व्हिसेस आणि संरक्षण क्षेत्रात सखोलपणे गुंतलेल्या उद्योग व्यावसायिकांशी संवाद साधण्याची एक अतुलनीय संधी आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती माहिती :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26 जानेवारी रोजी एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) पोस्ट करत या प्रदर्शनासंदर्भात माहिती दिली होती. "प्रजासत्ताक दिनाच्या या शुभ आणि अभिमानास्पद प्रसंगी, सरकारची घोषणा करताना मला अभिमान वाटतोय की, महाराष्ट्र आपल्या इतिहासात प्रथमच 17-19 फेब्रुवारी रोजी पुण्यात मेगा एमएसएमई डिफेन्स एक्स्पो आयोजित करत आहे. हा एक्स्पो त्रि-सेवांचे प्रणेते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरित आहे. आपला समृद्ध वारसा आणि प्रगती एकत्र साजरी करूया", असं फडणवीस म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details