बुलंदशहर (उत्तर प्रदेश) Homosexual Relations : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एक सून आपल्याच सासूच्या प्रेमात पडली आहे. इतकंच नाही तर सुनेनं सासूकडं समलैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तसंच पतीनं आपलं म्हणणं न पाळल्यास त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याची तिनं धमकी दिलीय, असा आरोप करत एका सासूनं पोलिसांकडं मदत मागितली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण : दिल्लीतील भजनपुरा येथे राहणारी एक महिला शनिवारी आपल्या मुलासह एसएसपी कार्यालयात पोहोचली. महिलेनं सांगितलं की ती बुलंदशहरमधील एका गावातील रहिवासी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या दिल्लीत राहत होत्या. दोन वर्षांपूर्वी तिच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न बुलंदशहर येथील एका गावात राहणाऱ्या मुलीशी झाले होते. मात्र लग्नानंतर सून पतीपासून अंतर राखू लागली, असा या महिलेचा आरोप आहे. नंतर सून म्हणाली, की तिचं सासूवर प्रेम आहे, ती तिच्या पतीसोबत राहणार नाही, हे ऐकल्यावर तिच्या पायाखालची वाळूच सरकली. परंतु याला महिलेनं विरोध केल्यावर सुनेनं फोनवर समलिंगी विवाहाशी संबंधित बातम्या दाखवल्या. इतकंच नाही तर न ऐकल्यास पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही सुनेनं दिली.