हैदराबाद Man Animal Conflicts : देशात राज्याची संख्या वाढली असून लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे. मात्र जंगल परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांनी मानव आणि वन्यजीव संघर्षात आपला जीव गमावला आहे. वाघ, हत्ती, आणि बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक नागरिकांचा बळी गेला. त्यामुळं नागरिकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातही चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, अमरावती या परिसरात मानव आणि वन्यजीव संघर्षात अनेक नागरिकांचा बळी गेला आहे.
का होतो मानव आणि वन्यजीव संघर्ष :जंगल परिसरात मानव आणि वन्यप्राणी संघर्ष मोठ्या प्रमाणात दिसून येतो. वन्य प्राणी आणि नागरिकांमध्ये संघर्ष का होतो, याबाबत अनेक विश्लेषक मतांतरं व्यक्त करतात. वन्य प्राण्यांच्या परिसरात मानवानं हस्तक्षेप केल्यानं हा संघर्ष शिगेला पोहोटला आहे. वन्य प्राण्यांच्या गरजा मानवी लोकसंख्येशी ओव्हरलॅप होतात, तेव्हा हा संघर्ष मानव आणि वन्य प्राणी या दोघांवरही परिणामकारक ठरतो.
देशात सध्या मानव वन्यप्राणी संघर्षाची वाढली प्रकरणं :मानवी वस्तीत शिरुन वन्यप्राण्यांनी हल्ला केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी देशाच्या धोरणात्मक गरजांमध्ये बदल करणं गरजेचं आहे. सध्या देशातील काही ठिकाणी मानव आणि वन्यप्राणी संघर्ष मोठ्या प्रमाणात होत आहे. यात मानव आणि वन्यप्राणी संघर्षाचे तीन विभागांमध्ये वर्गीकरण केलं जाऊ जाते. यात मानव आणि वाघ संघर्ष, मानव आणि बिबट्या संघर्ष आणि मानव आणि हत्ती संघर्ष असे तीन विभाग पडतात.
जगातील सगळ्यात मोठ्या खारफुटीत रक्तरंजित खेळ :बंगालमध्ये जगातील सगळ्यात मोठी खारफुटी बेटं आहेत. त्यात मानव आणि वन्यप्राणी संघर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा बळी जातो. बंगाल टायगर हा जगप्रसिद्ध असून बंगालच्या परिसरात 500 बंगाल टायगर राहतात. हे बंगाल टायगर वर्षाला 50 ते 100 नागरिकांचा बळी घेतात. त्यामुळं बंगालच्या भूमिवर मानव आणि वन्यप्राण्यांच्या संघर्षात मोठा रक्तरंजित खेळ सुरू असल्याचं स्पष्ट होते.