नवी दिल्ली Sitaram Yechury Admitted In AIIMS : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती खालावली आहे. सीताराम येचुरी यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सीताराम येचुरी यांना फुफ्फुसाचा त्रास असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली. सीताराम येचुरी यांना 19 ऑगस्टला न्यूमोनियामुळे प्रकृती खालावल्यानं त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आलं. सुरुवातीला त्यांना एम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं. मात्र सीताराम येचुरी यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं त्यांना रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सीताराम येचुरी यांना मिळाला सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार :सीताराम येचुरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आहेत. त्यासह ते राज्यसभेचे माजी खासदार आहेत. पक्षाचे सरचिटणीसपद त्यांनी दीर्घकाळ भूषवलं असून या पदाला पक्षप्रमुखपद असंच संबोधलं जाते. सीताराम येचुरी यांची 19 एप्रिल 2015 रोजी पक्षाचे सरचिटणीस म्हणून निवड झाली. तेव्हापासून सीताराम येचुरी या पदावर कार्यरत आहेत. त्यांना 2016 मध्ये राज्यसभेच्या सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.