महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राहुल गांधी पुन्हा वायनाडमधून लोकसभेच्या मैदानात! लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भरला अर्ज - Rahul Gandhi Files Nomination

Rahul Gandhi Files Nomination From Wayanad : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी आज बुधवार (दि. 3 एप्रिल)रोजी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ( Wayanad Lok Sabha constituency) राहुल यांनी येथील कलपेट्टा ते सिव्हिल स्टेशनपर्यंत रोड शो केला. यावेळी लाखोंच्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा वायनाडमधून लोकसभेच्या मैदानात
काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा वायनाडमधून लोकसभेच्या मैदानात

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 10:48 PM IST

वायनाड/केरळ :Rahul Gandhi Files Nomination From Wayanad : देशात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. आज काँग्रेसचे राष्ट्रीन नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी, के.सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी वायडनाडमधील लाखोंच्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कागदपत्रं सादर केल्यानंतर राहुल गांधींनी संविधान टिकवून ठेवण्याची शपथ वाचून दाखवली. प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल गांधी दरवर्षी 1 कोटींहून अधिकची कमाई करतात. (Wayanad Lok Sabha) 2022-23 या आर्थिक वर्षात राहुल गांधी यांचे वार्षिक उत्पन्न 1,02,78,680 रुपये होते, तर 21-22 मध्ये 1,31,04,970 कोटी रुपये होते. सध्या राहुल यांच्याकडे 55,000 रुपये रोख आहेत.

सन्मान आणि स्नेह आपल्या नेहमी स्मरणात राहील : उमेदवारीला जाताना राहुल गांधी यांनी वायनाडमधील जनतेला संबोधित केलं. आपण पाच वर्षांपूर्वी येथे आलो तेव्हा येथील जनतेने खासदार म्हणून आपली निवड केली. या काळात आपल्याला सन्मान दिला. प्रेम आणि स्नेह दिला. पहिल्यांदा आपण येथे आलो तेव्हा पुराने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. एवढ्या मोठ्या संकटाला जनता धैर्याने सामोरे जात होती. आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण होत नव्हतं. येथील जनतेने आपल्याला दिलेला सन्मान आणि स्नेह आपल्या नेहमी स्मरणात राहील, असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं. राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी प्रियंका गांधी यांनी ट्विट करत राहुल यांना शुभेच्छा दिल्या तसंच, भाजपवर जोरदार निशाणा साधला.

4 कोटींहून अधिक किमतीचे शेअर्स : राहुल यांच्या बँक खात्यात 26,25,157 रुपये जमा आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे केवळ 55 हजार रुपये रोख आहेत. याशिवाय, त्यांच्याकडे यंग इंडियनचे 1900 शेअर्स आहेत, ज्यांची किंमत 100 रुपये प्रति शेअर आहे. याशिवाय त्यांच्याकडे 4,33,60,519 रुपयांचे इतर कंपन्यांचे शेअर्स आहेत. त्यांनी म्युच्युअल फंडात 3,81,33,572 रुपये आणि गोल्ड बाँडमध्ये 15,21,740 रुपयांची गुंतवणूक केली आहे. यासोबतच पोस्ट ऑफिस आणि विमा पॉलिसींमध्ये 61,52,426 रुपये गुंतवले आहेत. राहुल यांची एकूण जंगम मालमत्ता 9,24,59,264 रुपयांची आहे.

11 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता : राहुल गांधी यांच्याकडे 11,15,02,598 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच, त्यांच्यावर 49,79,184 रुपयांचे कर्जही आहे. यासोबतच त्यांच्या नावावर दिल्लीतील मेहरौली येथे दोन शेतजमिनी आहेत. ही जमीन त्यांना वारसाहक्काने मिळाली आहे. या जमिनीची सध्याची किंमत 2,10,13,598 रुपये आहे. राहुल यांच्याकडे स्वतःचे घर नाही, पण गुरुग्राममध्ये 9 कोटी रुपयांच्या दोन व्यावसायिक इमारती आहेत.

26 एप्रिलला मतदान : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एकूण 10,92,197 पैकी 7,06,367 मते मिळवून विजय मिळवला आणि त्यांचे सर्वात जवळचे प्रतिस्पर्धी CPI चे PP सुनीर यांना फक्त 2,74,597 मते मिळाली होती. यावर्षी केरळमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे.

हेही वाचा :

1काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात सीपीआयच्या ॲनी राजा मैदानात; वायनाडमध्ये 'इंडिया' आघाडीतच जोरदार टक्कर - Lok Sabha Election 2024

2अरविंद केजरीवालांचं तब्बल 5 किलोनं घटलं वजन; आम आदमी पक्षाचा सरकारवर गंभीर आरोप - Arvind Kejriwal Lost 5 Kg Weight

3डॉ. ज्योती मेटेंनी घेतली शरद पवारांची भेट, बीडमधून उमेदवारी देण्याबाबत चर्चा - Lok Sabha election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details