महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हुबळीत काँग्रेस नेत्याच्या मुलीची हत्या, 'लव्ह जिहाद'चा पालकांचा आरोप; 'अभाविप'कडून घटनेचा निषेध - Hubli Murder Case - HUBLI MURDER CASE

Hubli Murder Case : हुबळी येथील बीव्हीबी महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली. त्यावरून भाजपानं काँग्रेस सरकारला धारेवर धरलं. तसंच ही हत्या लव्ह जिहादमधून झाल्याचा आरोप पीडित तरुणीच्या पालकांनी केलाय.

Hubli Murder Case
Hubli Murder Case

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 9:02 PM IST

Updated : Apr 20, 2024, 9:25 PM IST

हुबळी(कर्नाटक) Hubli Murder Case :कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील विद्यानगरमध्ये घडलेल्या ज्योती (नाव बदलेलं आहे) हत्या प्रकरणामुळं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. हे हत्या प्रकरण लव्ह जिहादचं असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली. दोषीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी पीडित तरुणीच्या कुटुंबानं केलीय. ज्योतीच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, "आमच्या मुलीसोबत जे घडलं, ते इतर कोणाच्याही बाबतीत होऊ नये. गरज भासल्यास सरकारनं यासाठी कायदा करावा. तसंच आरोपी फैयाजची चौकशी करून यामागची कारणं समजून घेण्याचा प्रयत्न करावा."

दोघांचंही एकामेकांवर प्रेम? : दुसरीकडं, आरोपीच्या आईनं लव्ह जिहाद प्रकरणाला स्पष्टपणे नकार दिलाय. संशयित आरोपीची आई म्हणाली की, "ज्योती तसंच फैयाज यांचं एकमेकांवर प्रेम होतं. माझ्या मुलाच्या वतीनं मी कर्नाटकातील सर्व लोकांची माफी मागते. मी मुलीच्या पालकांचीही माफी मागते. ती माझ्या मुलीसारखी होती. त्याच्या कुटुंबाप्रमाणेच मीही दु:खी आहे. माझ्या मुलानं जे केलं ते चुकीचं आहे. यासाठी त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याच्या कृत्यामुळं आमची मान शरमेनं झुकवली आहे. घरी बसण्याचा कंटाळा आल्याचं सांगून तो 13 एप्रिलला घरातून निघून गेला होता."

मुलाच्या कृत्यामुळं मान शरमेनं झुकली : "ज्योती चांगली मुलगी होती. फैयाज तसंच ज्योती केवळ चांगले मित्रच नव्हते, तर एकमेकांवर प्रेमही करत होते. हे मला गेल्या एक वर्षापासून माहीत होतं. त्यांचं एकतर्फी प्रेम नव्हतं. माझा मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार होता. पण मी त्याला आधी करिअरवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं होतं. तो अभ्यासात खूप हुशार आहे. ज्योतीही हुशार होती. दोघांनीही आयएएसची तयारी करावी अशी, माझी इच्छा होती. पण त्यानं माझी मान शरमेनं झुकवली आहे. त्यानं केलेल्या कृत्याचं फळ त्याला भोगावं लागणार आहे. मी आई असल्यानं ज्योतीच्या कुटुंबावर कोसळलेलं दु:ख समजू शकते," अशी प्रतिक्रिया संशयित आरोपीच्या आईनं दिली.

भाजपाची काँग्रेस सरकारवर टीका : ज्योतीच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त केलं आहे. "मी, नगरसेवक असूनही माझ्या कुटुंबाबाबत असं घडत असेल, तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न समजतो," असं त्यांनी म्हटलं. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. ज्या मुलीची हत्या झाली तिचे वडीलही काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. अशा परिस्थितीत सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजपानं सिद्धरामय्या सरकारवर हल्लाबोल करत कायदा, सुव्यवस्थेच्या प्रश्नावर काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप केलाय.

गृहमंत्र्यांनी मागितली माफी : शनिवारी सदाशिवनगर येथील निवासस्थानाजवळ पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हणाले, "सत्य कधीही लपवता येत नाही. काही लोकांना त्याबद्दल माहिती नाही. भाजपा या प्रकरणाचं राजकारण करत आहे. राज्यात कायदा, सुव्यावस्था राखण्याची आमची जबाबदारी असून तपास सुरू आहे. आम्ही अहवालाच्या आधारे माहिती दिली आहे. ते दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. तरुणीनं पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानं ही घटना घडल्याचं वृत्त आहे. यात लव्ह जिहाद नाही. माझ्या वक्तव्यामुळं ज्योतीच्या आई-वडिलांना दु:ख झालं असेल, तर मी त्यांची माफी मागतो."

गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा ABVP कडून निषेध : त्यावर भाजपा प्रणित अभाविप संघटनेनं आक्षेप घेत जोरदार निदर्शनं केलीत. गृहमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी सरकारचा निषेध करत न्यायाची मागणी केली. त्यांनी काही वेळ घरासमोर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी परमेश्वर यांच्या निवासस्थानाभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 100 हून अधिक पोलिसांनी गृहमंत्र्यांच्या घराजवळ दोन्ही बाजूंनी बॅरिकेड करून कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

काय आहे प्रकरण : BVB महाविद्यालयात सध्या परीक्षा सुरू आहेत. 18 एप्रिल 2024 दुपारी 4.45 वाजता 24 वर्षीय एमसीएची विद्यार्थिनी ज्योती परीक्षेसाठी कॉलेजमध्ये आली होती. परीक्षा दिल्यानंतर ती लगेच परीक्षा केंद्रातून बाहेर पडली. त्यानंतर तिनं आईशी फोनवर संवाद साधला. त्यानंतर आरोपीनं ज्योतीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण, कदाचित ज्योती संवाद साधायला तयार नव्हती, असं सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. या गोंधळात आरोपीनं खिशातून चाकू काढत ज्योतीवर सपासप वार केले.

हे वाचलंत का :

  1. पूर्व नागालँडच्या सहा जिल्ह्यांमध्ये २० आमदारांसह एकानंही केलं नाही मतदान, शून्य टक्के मतदानाचं कारण तरी काय? - Lok Sabha Election 2024
  2. बंगळुरुमध्ये नायजेरियन नागरिकांचा पोलिसांवर हल्ला; 8 परदेशी नागरिकांना अटक - 8 Foreign Nationals Arrested
  3. झारसुगुडा बोट अपघात: ओडिशात बोट उलटून सात प्रवाशांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता - Jharsuguda Boat Mishap
Last Updated : Apr 20, 2024, 9:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details