नवी दिल्लीNarendra Modi :लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) विजयाबद्दल 50 हून अधिक जागतिक नेत्यांनी निवर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो-बिडेन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचाही अभिनंदन करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर मोदी सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या करणार आहेत, हे विशेष.
काय म्हणाले जो बिडेन? : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो-बिडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच अभिनंदन केलंय. राष्ट्राध्यक्ष जो-बिडेन यांनी ट्विटरवर लिहिलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं विजयाबद्दल अभिनंदन. लोकसभेच्या ऐतिहासिक निवडणुकीत मतदारांचं देखील त्यांनी अभिनंदन केलंय. आमच्या देशांमधील मैत्री आणखीनच वाढत आहे, असं त्यांनी ट्विट केलंय
पुतीन यांनी केला मोदींना फोन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही दूरध्वनी वरून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं, असं रशियाच्या अध्यक्षीय कार्यालयानं बुधवारी सांगितलं. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक संसदीय निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
ऋषी सुनक यांच्याकडून मोदींचं अभिनंदन :ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलंय. ऋषी सुनक म्हणाले की, ब्रिटन तसंच भारताची मैत्री घट्ट आहे. ही मैत्री वाढतच जाणार आहे. दरम्यानं, भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (एनडीए) बुधवारी नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून एकमतानं निवड केली. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून देशाची सूत्रे हाती घेणार आहेत. 290 हून अधिक जागा मिळवून एनडीएनं 543 सदस्यीय लोकसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेला 272 चा जादुई आकडा पार केला आहे. मात्र, २०१४ नंतर प्रथमच स्वबळावर बहुमताचा जादुई आकडा गाठण्यात भाजपाला अपयश आलं आहे.
'या' देशांच्या नेत्याकडून मोदींना शुभेच्छा :लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल जगभरातून मोदींवर सुभेच्छाचा वर्षाव होत आहे. यामध्ये श्रीलंका, मालदीव, इराण, नेपाळ, बांगलादेश, भूतान, म्यानमारसह मॉरिशसच्या पंतप्रधानांनी मोदींना शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानंही 'एक्स' पोस्टमध्ये मोदींचं अभिनंदन केलंय. तसंच इटली, जपान, दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींचं निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे.
मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव :आफ्रिकेपासून नायजेरिया, केनिया, कोमोरोसच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींना शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. जमैका, बार्बाडोस, गयाना या कॅरेबियन बेटांतील नेत्यांनीही मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. मोदींचे अभिनंदन करणाऱ्या आग्नेय आशियाई नेत्यांमध्ये मलेशियाचे पंतप्रधान, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी मोदींसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत-भूतान संबंध अधिक घट्ट होतील, अशी आशाही यांनी व्यक्त केली.
झेलेन्स्कींनी केली भारताकडून सहकार्याची अपेक्षा : युक्रेननंही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले, भारताच्या संसदीय निवडणुकीत सलग तिसऱ्या विजयाबद्दल मोदींसह, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकारचं मी अभिनंदन करतो. मी भारतातील लोकांसाठी शांतता, समृद्धीची इच्छा व्यक्त करतो. तसंच भरताकडून सहकार्याची अपेक्षा करतो. दोन्ही देशाची भागीदारी वाढत राहो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलीय.
हे वचालंत का :
- नरेंद्र मोदी यांची भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवड, राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब, शपथविधीचंही दिलं निमंत्रण - PM Narendra Modi Oath Ceremony
- राष्ट्रवादीच्या काही लोकांनी काम केलं नाही, पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांचा भुजबळांवर निशाणा - Hemant Godse On Election 2024
- शिंदेंचे नव्हे तर ठाकरेंचे आमदार आमच्या संपर्कात; शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा दावा - Lok Sabha Result