नवी दिल्ली SC On Children Of Voidable Marriage : अवैध विवाहातून जन्मलेल्या अपत्यांनाही आई वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानं याबाबतचा आदेश दिला आहे. त्यामुळं अवैध विवाह जरी असला, तरी आई वडिलांच्या संपत्तीत अपत्यांना वाटा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानं हिंदू मॅरेज अॅक्टच्या 16 ( 3 ) ची कक्षा रुंदावली आहे. तर अवैध विवाहातून जन्मलेल्या अपत्यांना या निर्णयानं दिलासा मिळाला आहे.
काय म्हणालं न्यायालय :न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि एस व्ही एन भट्टी यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. यावेळी निर्णय देताना खंडपीठ म्हणालं की, " केवळ कुटुंबातील कलहामुळं संपत्तीच्या वाट्यात कमी-जास्त प्रमाण होते. मात्र अवैध विवाहातून जन्मलेल्या अपत्यांनाही आई वडिलांच्या संपत्तीत अधिकार आहेत. न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि एस व्ही एन भट्टी यांच्या खंडपीठानं मुथ्थूस्वामी प्रकरणात सुनावणी घेताना हा निर्णय दिला. मुथ्थूस्वामी यांनी तीन लग्न केल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र त्यांचं 1982 मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपत्तीच्या वाट्यावरुन वाद उद्भवल्यानं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं.