नवी दिल्ली- देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढणारे अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी संपूर्ण जगावर छाप टाकली होती. त्यांनी 2004 ते 2014 या काळात पंतप्रधान म्हणून घेतलेल्या निर्णयांमुळे देशात आमुलाग्र बदल झाले. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीविषयी ( Manmohan singh Profile) माहिती जाणून घेऊ.
- डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पश्चिम पंजाबमधील गाह येथे झाला. फाळणीनंतर गाहचा पाकिस्तानमध्ये समावेश आहे. त्यांच्या वडिलांचे नाव गुरुमुख सिंग आणि आईचे नाव अमृत कौर होते.
- डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. ते एमए इकॉनॉमिक्समध्ये विद्यापीठात सर्वप्रथम आले होते. त्यांनी 1957 मध्ये जगातील प्रसिद्ध असलेल्या केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण मिळविले.
- मनमोहन सिंग यांनी 1958 मध्ये गुरशरण कौर यांच्याशी विवाह केला. त्यांना उपिंदर सिंग, दमन सिंग आणि अमृत सिंग नावाच्या तीन मुली आहेत.
- त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल केले.
- मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापन केले.
- 1971 मध्ये त्यांची विदेश व्यापार मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी पार पाडली.
- 1972 ते 1976 पर्यंत ते अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार होते.
- डॉ. मनमोहन सिंग 1976 ते 1980 पर्यंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.
- एप्रिल 1980 ते सप्टेंबर 1982 पर्यंत ते नियोजन आयोगाचे सदस्य सचिव होते.
- सप्टेंबर 1982 ते जानेवारी 1985 पर्यंत त्यांनी पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले.
- जानेवारी 1985 ते जुलै 1987 पर्यंत त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद भूषवले.
- 1987 ते 1990 पर्यंत जिनिव्हा येथील दक्षिण आयोगाचे महासचिव होते.
- पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदेही त्यांनी भूषवली.
- मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1991 मध्ये ते पहिल्यांदा आसाममधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये त्यांना अर्थमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. देशाची अर्थव्यवस्था अंत्यत कठीण परिस्थितीमधून जात असताना अर्थमंत्री पद म्हणजे काटेरी मुकूटच होता. अशा परिस्थितीत मनमोहन सिंग यांनी अर्थतज्ञ म्हणून असलेल्या ज्ञानाचा कुशलतेनं वापर केला. पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासोबतच त्यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारत विदेशी गुंतवणुकीकरिता देशाची बाजारपेठ खुली केली. त्यामधून विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळालं. त्यामुळे भारत ही जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांमधील महत्त्वाचा देश ठरला.
- 1998 ते 2004 या काळात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पार पाडली.
- 2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं विजय मिळविल्यानंतर 14 वे पंतप्रधान म्हणून त्यांनी पदाची शपथ घेतली.
- मनमोहन सिंग यांनी 22 मे 2004 रोजी पहिल्यांदा आणि 22 मे 2009 रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात यूपीए-1 आणि यूपीए- 2 मध्ये त्यांनी दोनवेळा पंतप्रधान पद भूषवले.
- डॉ. मनमोहन सिंग 1991 पासून सलग पाच वेळा राज्यसभेचे खासदार म्हणून कार्यरत राहिले. सहाव्यांदा ते 3 वर्षांसाठी राज्यसभेचे खासदार झाले. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 33 वर्षांचा होता.
- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाच्या विकासात महत्त्वाचं योगदान दिलं. योगदानाबद्दल त्यांना 1987 मध्ये पद्मविभूषण, 1993 मध्ये अर्थमंत्र्यांसाठी युरो मनी पुरस्कार, 1993 आणि 1994 मध्ये अर्थमंत्र्यांसाठी आशिया मनी पुरस्कार आणि 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.
#WATCH | Delhi: On the demise of former PM Manmohan Singh, Former Union Minister Dr Ashwani Kumar says, " i believe that the demise of manmohan singh is not just a setback but a colossal tragedy. his passing in such a time when the politics of india is taking such a turn which is… pic.twitter.com/nnKpYiLqlw
— ANI (@ANI) December 27, 2024
सात वेळा झाली होती बायपास सर्जरी- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. या वर्षी एप्रिलमध्ये राज्यसभेतील कार्यकाळ पूर्ण करून मनमोहन सिंग निवृत्त झाले होते. एक वर्षापेक्षा जास्त काळ ते फक्त व्हीलचेअरच्या मदतीने फिरत होते. डॉ.मनमोहन सिंग हे मोतीलाल नेहरू मार्ग येथील सरकारी निवासस्थानी कुटुंबासह राहत होते. डॉ मनमोहन सिंग यांच्या हृदयावर सात वेळा बायपास शस्त्रक्रियाही झाली होती. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. सुमारे 15 दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला होता.
हेही वाचा-