महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

श्रीदेवी मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून खासगी गुप्तहेराविरुद्ध आरोपपत्र दाखल, जाणून घ्या प्रकरण - श्रीदेवी मृत्यू प्रकरण

Sridevi Death Case: अभिनेत्री श्रीदेवी हिच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने खासगी गुप्तहेरावर आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयच्या अहवालानुसार, खासगी गुप्तहेरानं यूट्यूबवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री यांच्याशी संबंधित सादर केलेली कागदपत्रे तपासात खोटी असल्याचं समोर आलं आहे.

CBI files charge sheet
श्रीदेवी मृत्यू प्रकरणी

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 10:51 PM IST

Updated : Feb 5, 2024, 6:54 AM IST

नवी दिल्ली Sridevi Death Case : सीबीआयनं आज (4 फेब्रुवारी) खासगी गुप्तहेराविरोधात आ रोपपत्र दाखल केलं आहे. गुप्तहेरानं अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूसंदर्भात यूट्यूबवरील व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण यांच्या विरोधात खोट्या बातम्या दिल्या होत्या. (CBI Sridevi Case ) मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह नेत्यांची बनावट पत्रे सादर केली. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.

बनावट नोंदी दाखवून केला दावा: मुंबईतील वकील चांदनी शाह यांच्या तक्रारीनंतर गेल्या वर्षी केंद्रीय अन्वेषण विभागानं भुवनेश्वर येथील दीप्ती आर पिन्निती आणि तिचे वकील भरत सुरेश कामथ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण पंतप्रधान कार्यालयानं (पीएमओ) एजन्सीला पाठवलं होतं. चांदनी शाह यांनी आरोप केला आहे की, पिन्नितीने पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांची पत्रे, सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कागदपत्रे आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) सरकारच्या रेकॉर्डसह अनेक दस्तऐवज तयार केले. तपासात हे बनावट असल्याचं दिसून आलं. श्रीदेवी आणि सुशांत सिंग राजपूत यांसारख्या बॉलिवूड कलाकारांच्या मृत्यूच्या चर्चेत पिन्निती ही सोशल मीडियावर सक्रिय होती.

काय आहे पिन्नितीचं म्हणणं? फेब्रुवारी २०१८ मध्ये दुबई येथे श्रीदेवी हिचे निधन झाले. पिन्नितीने आपल्या 'चौकशी'च्या आधारे एका मुलाखतीत 'दोन सरकारांमधील कव्हर अप' यासह खळबळजनक दावे केले होते. पिन्नीती म्हणाल्या, 'सीबीआयने माझं म्हणणं न नोंदवता माझ्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. आरोप निश्चित झाल्यावर पुरावे न्यायालयाला दिले जातील.'

पिन्नितीच्या निवासस्थानाची झडती: गेल्या वर्षी पिन्नितीच्या विरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर, सीबीआयने 2 डिसेंबर रोजी भुवनेश्वरमधील तिच्या निवासस्थानाची झडती घेतली होती. ज्यामध्ये फोन आणि लॅपटॉपसह डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली होती. विशेष न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सीबीआयच्या अहवालानुसार, यूट्यूबवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी सादर केलेली कागदपत्रं बनावट असल्याचं तपासात उघड झालं आहे. एजन्सीने पिन्निती आणि कामथ यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार १२०-बी (गुन्हेगारी कट), ४६५, ४६९ आणि ४७१ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहेत.

हेही वाचा:

  1. घोडेबाजार टाळण्याकरिता काँग्रेसची तयारी, नितीश कुमारांच्या फ्लोअर टेस्टपूर्वी आमदारांना हैदराबादला हलवलं!
  2. उपराज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिलं उत्तर; वित्त आणि आरोग्य सचिव बदलण्याची केली मागणी
  3. संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित समजला जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्काराचं आयोजन कधी? पंतप्रधान मोदींनाही मिळालयं नामांकन
Last Updated : Feb 5, 2024, 6:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details