उधमसिंग नगरBaba Tarsem Singh Murder : उत्तराखंडमधील उधम सिंग नगर येथे नानकमत्ता गुरुद्वाराचे डेरा कारसेवा प्रमुख बाबा तरसेम सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमुळं पंजाबमध्ये शोकाकुल वातावरण आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुमारे महिनाभरापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर हत्या होणार असल्याची भीती व्यक्त केली होती, मात्र तरीदेखील त्यांना सुरक्षा देण्यात आली नव्हती.
ज्ञात हल्लेखोरानं झाडल्या गोळ्या :मिळालेल्या माहितीनुसार, कार सेवा डेरा प्रमुख नानकमत्ता बाबा तरसेम सिंग (60) यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरानं गोळ्या झाडल्या. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत तरसेम सिंग यांना उपचारासाठी खातिमा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथं त्यांचा मृत्यू झाला. हत्येच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. तसंच हल्लेखोराच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आलीत.
घटनेचा तपास सुरू : मिळालेल्या माहितीनुसार, नानकमट्टा येथे डेरा प्रमुख तरसेम सिंग यांच्यावर तीन सेकंदात हल्लेखोरांनी दोनवेळा गोळ्या झाडल्या. हल्लेखोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. एसएसपी मंजुनाथ टीसी यांनी सांगितलं की, घटनेचा तपास सुरू आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या हल्लेखोरानं दोन गोळ्या झाडल्या. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.