पाटणा Memories of Emergency In Bihar : 25 जून 1975 चा दिवस इतिहासाच्या पानात नोंदला गेला आहे. कारण रातोरात देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली. आणीबाणी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील 'काळा अध्याय' म्हणून ओळखला जातो. या घटनेला आज ५० वर्षे पूर्ण झालीत. तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी इंदिरा गांधींच्या म्हणण्यावरून घटनेच्या कलम ३५२ नुसार देशात आणीबाणी जाहीर केली. आणीबाणीच्या २१ दिवसांच्या काळात इंदिरा गांधींनी राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबलं आणि त्यांचा छळ केला. इंदिराजींच्या एका निर्णयानं भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात एकच खळबळ माजली होती. त्याचा परिणाम असा झाला की, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली देशात 'संपूर्ण क्रांती' सुरू झाली. स्वातंत्र्याच्या ३० वर्षानंतरच प्रथमच बिगर काँग्रेस सरकार स्थापन झालं.
देशात आणीबाणी लागू: ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बागी म्हणाले की, राज्यघटनेत राष्ट्रपती राजवटीची तरतूद आहे, परंतु इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली तेव्हा त्यांनी घटनात्मक तरतुदीही बाजूला ठेवल्या. इंदिरा गांधी यांनी संविधानाच्या कलम 352 नुसार आणीबाणी जाहीर केली होती. भारताच्या इतिहासातील हा सर्वात वादग्रस्त निर्णय मानला जातो. आणीबाणीच्या काळात नागरी हक्क संपुष्टात आणले गेले. तसंच प्रेसवरही बंदी घालण्यात आली होती. विशेष 'मंत्रिमंडळाची बैठक न घेता इंदिरा गांधींनी मध्यरात्री आणीबाणी लागू केली आणि 12 वाजता राष्ट्रपतींची स्वाक्षरी करून घेतली'. मंत्रिमंडळातील सदस्यांना सुद्धा सकाळी सांगण्यात आलं होतं.
सदस्यत्व रद्द झाल्यानंतर इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली: १२ जून १९७४ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना निवडणूक हेराफेरीसाठी दोषी ठरवलं आणि त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यासही बंदी घातली. हा निर्णय त्यांना झोंबला. त्यानंतर इंदिरा गांधींनी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना आणीबाणी जाहीर करण्याची शिफारस केली होती.
राज नारायण यांनी याचिका दाखल केली होती: 10 मार्च रोजी इंदिरा गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी राज नारायण यांचा 1 लाख 10,000 मतांनी पराभव केला होता. या निकालावर राज नारायण यांचा विश्वाच बसला नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावत इंदिरा गांधींवर चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला.