महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारच्या राजकीय संघर्षात लालू यांच्या मुलीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, भाऊ तेजस्वीचं केलं कौतुक - तेजस्वी यादव

Bihar Political Crisis : बिहारमध्ये सत्ताबदलाच्या शक्यतेवरुन आरजेडी आणि जेडीयूमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नाव न घेता दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. आता लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत आपलं मत व्यक्त केलंय.

Bihar Political Crisis
Bihar Political Crisis

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 10:44 AM IST

पाटणा Bihar Political Crisis : एकीकडं मुख्यमंत्री नितीशकुमार महागठबंधन सोबतची साथ सोडून भाजपासोबत सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. तोच दुसरीकडं त्यांना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रीय जनता दलाकडून (आरजेडी) प्रयत्न सुरू आहेत. आरजेडी अध्यक्ष लालू यादव यांच्या मुलीनं सोशल मीडियावरुन नितीश कुमारांवर निशाणा साधलाय. त्यांनी X वर (पुर्वीचं ट्विटर) एक पोस्ट करत म्हटलंय, "काहीही झालं तरी ते जातीयवादी शक्तींविरुद्ध लढत राहतील."

रोहिणी आचार्य यांनी काय लिहिलं :सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या आरजेडी अध्यक्ष लालू यादव यांच्या मुलीने X वर लिहिलं की, "आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही जातीय शक्तींविरुद्ध आमचा लढा सुरुच ठेवू." तसंच त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं की, "लाखो तरुणांच्या चेहऱ्यावर उमललेलं हास्य, ही तेजस्वीची ओळख आहे. ही ओळख मी पाहिली आहे."

नितीश विरोधात आरजेडीची रणनीती तयार :नितीश कुमारांच्या साथ सोडण्याच्या चर्चेदरम्यान, आरजेडीनंही आपले प्रयत्न सुरू केले आहेत. शनिवारी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली आरजेडीचे सर्व आमदार, विधानपरिषद आणि मोठ्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत तेजस्वी यांनी आपल्या नेत्यांना एकजूट राहण्याचं आवाहन केलं. तसंच यावेळी ते नितीश कुमार यांना सहजासहजी सत्ता बदलू देणार नसल्याचंही सांगितलं.

काय आहे बिहार विधानसभेचं गणित :243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत आरजेडी सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांचे 79 आमदार आहेत. आरजेडीकडे काँग्रेसचे 19, सीपीआय (एमएल) 12, सीपीआयचे 2 आणि सीपीआय (एम) चे 2 आमदार आहेत. ही संख्या 114 आहे. तर बदललेल्या परिस्थितीत नितीश कुमार यांना जेडीयू मधील 45 त्याव्यतिरिक्त 78 भाजप आमदार, 4 हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि एक अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळू शकतो. एकूणच ही संख्या 128 वर पोहोचल्याचं दिसते. तर एमआयएमचा एक आमदार महाआघाडीसोबत जाऊ शकतो.

हेही वाचा :

  1. बिहारमध्ये राजकीय वादळ! नितीश कुमार भाजपाच्या गोटात गेल्याचं निश्चित, अ‍ॅक्शन मोडमध्ये आले तेजस्वी यादव
  2. एका हातात राजीनामा तर दुसऱ्या हातात भाजपाचं समर्थन पत्र; नितीश कुमार 'खेला' करणारच
  3. बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार राहणार की NDA पुन्हा येणार सत्तेत, जाणून घ्या विधानसभेचं गणित

ABOUT THE AUTHOR

...view details