बंगळुरू (कर्नाटक):मेट्रो कर्मचाऱ्यांचे शेतकऱ्याचा अपमान करणारे वर्तन प्रवाशाच्या मोबाईलमध्ये कैद झालं आहे.त्यानंतर जनतेमध्ये संताप व्यक्त झाला. जनतेचा संताप पाहून बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (BMRCL) आरोपी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केलं आहे.
शेतकऱ्याला आत जाऊ न दिल्यानं कर्मचाऱ्यांवर संतप्त झालेल्या सहप्रवाशांनी शेतकऱ्याला मेट्रो स्टेशनच्या प्रवेश मिळवून दिला. मात्र, शेतकऱ्याला मेट्रोत प्रवेश नाकारल्यानं सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. ''तुम्ही चांगले कपडे घातले असाल तरच तुम्हाला मेट्रोमध्ये प्रवेश दिला जाणार का? गरिबांना मेट्रो प्रवास सेवा मिळू शकत नाही का?'' असा सवाल जनतेनं सोशल मीडियावर केला आहे.
बीएमआरसीएलने या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, "नम्मा मेट्रो हे सर्व लोकांसाठी सुलभ आणि सार्वजनिक वाहतुकीचं सर्वांसाठीचं साधन आहे. राजाजीनगर मेट्रो स्थानकात ही घटना घडली. याची चौकशी करण्यात आली आहे. तेथे तैनात असलेल्या सुरक्षा पर्यवेक्षकाच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. आम्ही प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत." बीएमआरसीएलचे एमडी एम. महेश्वर राव यांनी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचा आदेश दिले आहेत. तसेच चौकशीचं आश्वासनही दिले आहे.