ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये झाडाझडतीची शक्यता, पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर

राज्यातील निकालानंतर काँग्रेसमध्ये वाद उफाळून आले आहेत. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये झाडाझडतीची शक्यता आहे.

Varsha Gaikwad and Nana Patole
वर्षा गायकवाड आणि नाना पटोले (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

मुंबई - विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावे, अशी मागणी पक्षातून केली जातेय. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून या पराभवाचे चिंतन केले जाण्याची आणि महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रभारी यांची कामगिरी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जातेय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याची चर्चा सोमवारी सकाळी सुरू झाली, मात्र प्रदेश काँग्रेसकडून त्याचा इन्कार करण्यात आलाय. नाना पटोले यांना दिल्लीत बोलावले असून, त्यांची बाजू ऐकल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाण्याची माहिती देण्यात येतेय.

काँग्रेस पक्षात झाडाझडती होण्याची शक्यता: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षात झाडाझडती होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत संपूर्ण राज्यभरात अवघ्या 16 जागांवर विजय मिळवता आलाय. काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जाणारे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अवघ्या 208 मतांनी विजय मिळालाय.‌‌ या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात पराभवाची जबाबदारी निश्चित करावी आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या नेत्यांना राजीनामा देण्यास सांगावे, अशी मागणी पक्षातून पुढे येतंय. विधानसभा निवडणुकीतील या अनपेक्षित आणि दारुण पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वाकडून राज्यातील नेतृत्व मुंबईतील नेतृत्व बदलाबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी पुढे येतेय.

निर्णय प्रक्रियेत सर्वांना सामावून घेतले नसल्याचा आक्षेप: पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आणि प्रचारामध्ये ज्येष्ठ नेत्यांना पुरेशा प्रमाणात सामावून घेतले नसल्याची खंत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केलीय. काँग्रेसच्या परंपरागत गड समजला जाणाऱ्या वर्सोवा, भायखळा या जागांसाठी आग्रह न करता या जागा मित्र पक्षांसाठी सोडण्यात आल्यात. मुंबईत नगण्य जागांवर पक्षाने उमेदवार उभे केलेत. लोकसभेत पक्षाला मिळालेल्या यशामुळे स्थानिक नेतृत्वाने आपल्या मर्जीतील उमेदवारांसाठी प्रयत्न केले. मुंबई अध्यक्ष म्हणून संपूर्ण मुंबईतील प्रचारात सहभाग असल्याचे चित्र दिसून आले नाही, अशी टीका भाई जगताप यांनी केलीय.

मुख्यमंत्री पदावरून झालेल्या गोंधळाचा फटका काँग्रेसला बसला : लोकसभेत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्याचे आणि राज्यात प्रथम क्रमांकावर पक्ष आल्याचे श्रेय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष यांनी घेतलेत. त्याचप्रमाणे आता राज्यातील आणि मुंबईतील काँग्रेस पक्षाच्या पराभवाची जबाबदारी देखील त्यांनी घ्यावी, या पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष या दोघांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार भाई जगताप यांनी केलीय. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा घोळ आणि मुख्यमंत्री पदावरून झालेल्या गोंधळाचा फटका काँग्रेसला बसला असण्याची शक्यता त्यांनी वर्तवलीय. काँग्रेसचे मुंबईतील नेते चंद्रकांत हंडोरे, सुरेश शेट्टी, भाई जगताप यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान न देता डावलण्यात आल्याचा फटका पक्षाला बसला असल्याचा आरोप जगताप यांनी केलाय. गायकवाड यांनी केवळ आपल्या मर्जीतील उमेदवारांसाठी प्रयत्न केले आणि इतर उमेदवारांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. संपूर्ण प्रचारादरम्यान मुंबई अध्यक्ष म्हणून गायकवाड यांची उपस्थिती पुरेशा प्रमाणात दिसली नाही, असे जगताप यांचे म्हणणे आहे.

काँग्रेसची पुढील वाटचाल कशी असणार? : काँग्रेसच्या पराभवानंतर आता पक्षातून विरोधाचा सूर उमटू लागल्याने काँग्रेस श्रेष्ठी याबाबत काय निर्णय घेतात, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागलंय. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी हा निकाल अविश्वसनीय आणि अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या निकालाबाबत पक्षश्रेष्ठींना अहवाल पाठवण्यात येईल आणि त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे लवकरच काँग्रेसमध्ये पराभवाची जबाबदारी निश्चित करून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जातेय.

हेही वाचा :

  1. गृहमंत्री झालो तर महायुतीतील 'या' नेत्यांना थेट जेलमध्ये टाकणार - रोहित पवार
  2. काकांवर पुतण्याच भारी! अजितदादांच्या राष्ट्रवादीला 35 जागांवर आघाडी, तर शरद पवारांच्या वाट्याला...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.