महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सायबर गुन्हे करण्याकरिता कर्मचाऱ्यांना पगारी ठेवून साडेचार कोटींची फसवणूक, देशाच्या सिलिकॉन व्हॅलीतील धक्कादायक घटना - cyber crime - CYBER CRIME

Bengaluru Fraudster Arrested : कर्नाटकची राजधानी बंगळुरु इथं सायबर गुन्हे पोलिसांनी विमा कंपन्यांच्या नावाखाली कॉल करुन कोट्यवधी रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला अटक केलीय. त्याच्यावर आतापर्यंत 34 गुन्हे दाखल असून त्यानं आतापर्यंत सुमारे साडेचार कोटींची फसवणुक केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

विम्याच्या नावाखाली साडेचार कोटींची फसवणूक करणाऱ्या उच्चशित्रित तरुणाला अटक
विम्याच्या नावाखाली साडेचार कोटींची फसवणूक करणाऱ्या उच्चशित्रित तरुणाला अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 10:26 AM IST

बंगळुरु Bengaluru Fraudster Arrested : बनावट वेबसाईट तयार करुन विमा कंपन्यांच्या नावाखाली कॉल करुन कोट्यवधी रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्याला शहरातील सायबर गुन्हे पोलिसांनी अटक केलीय. मनवीर सिंग असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशतील गाझियाबादचा रहिवासी आहे. यात फसवणूक झालेल्या मुरलीधर राव यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केलीय. विमा काढण्याच्या बहाण्यानं आरोपीनं अनेकांची साडेचार कोटींची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलंय.

विम्याचं आमिष दाखवून उकळले लाखो रुपये : बीएस्सी पदवीधर असलेला मनवीर गेल्या चार वर्षांपासून फसवणुकीसाठी गुन्हे करत होता. त्यानं नामांकित बँकांच्या नावाने बनावट वेबसाईट उघडल्या. कमी वेळात जास्त पैसे मिळवण्यासाठी विमा योजना आहे, असे त्यानं जाहिरातीत छापले होते. जनतेला विमा कंपन्यांच्या नावाने फोन करून प्रीमियम बॉण्ड्सचे आमिष दाखवायचा. त्यासाठी पॉलिसी घ्यायला भाग पाडायचा. पोलिसांनी सांगितले की, लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून लाखो रुपये ऑनलाइन भरले.

विम्याचा प्रीमियम बॉंड आल्याचं सांगत गंडवलं : उत्तर प्रदेशात फसवणूक करणाऱ्या आरोपीनं रेकॉर्ड गोळा करण्यासाठी एका कन्सल्टन्सीशी संपर्क साधला होता. त्याद्वारे एका कर्मचाऱ्याला काम दिलं होतं. जमा केलेली कागदपत्रं तो कर्मचाऱ्याला फोनवरुन ग्राहकाचा पत्ता सांगून कुरिअर करत होता. मुरलीधर राव नावाच्या व्यक्तीलाही त्यानं अशाच प्रकारे फसवणुकीचा बळी बनवलं. आरोपीनं एका विमा कंपनीकडून बोलत असल्याचं सांगून मुरलीधर राव यांना फोन केला होता. त्यांच्या नावावर प्रीमियम बाँड आला आहे. तो मिळवण्यासाठी तुम्हाला विमा काढावा लागेल, असं सांगितलं. यामुळं मुरलीधरन यांनी फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात चार लाख रुपयेही भरले. खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर मात्र त्यानं बनावट बाँड दिले.

फसवणुकीचे 34 गुन्हे दाखल : मुरलीधर यांनी त्याला अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन बंद होता. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मुरलीधर यांनी याबाबत तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचं सांगितलंय. आरोपींविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे 34 गुन्हे दाखल असल्याचंही तपासात समोर आलंय. आतापर्यंत विविध ग्राहकांची सुमारे साडेचार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं शहर पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. ऑनलाइन घर खरेदी किंवा भाड्याने घेत असाल तर सावधान, बनावट एजंटच्या टोळीला सायबर पोलिसांनी केली अटक - rupees fraud by estate agents
  2. गुंतवणूकदारांना 100 कोटींचा गंडा : सीए अंबर दलाल विरोधात मुंबई पोलिसांनी जारी केलं लुक ऑउट सर्कुलर - LOC Against CA Amber Dalal

ABOUT THE AUTHOR

...view details