महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्यावर विनयभंगाचा आरोप, पोलीस अधिकारी राजभवनात दाखल - Governor Bose accused molestation

Governor Bose Accused Molestation : राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्यावर राजभवनाच्या एका अस्थायी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या संदर्भात कोलकाता येथील हेअर स्ट्रीट पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार प्राप्त होताच कोलकाता पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, राजभवनासमोरही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

Governor Bose accused molestation
Governor Bose accused molestation (National Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 10:25 PM IST

कोलकाता Governor Bose Accused Molestation:पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांच्यावर एका महिलेनं विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. आतापर्यंत मिळालेल्या वृत्तानुसार, महिलेनं गुरुवारी संध्याकाळी राजभवनच्या प्रभारी अधिकाऱ्याकडं तक्रार केलीय. या महिलेचा आरोप आहे की, राज्यपाल गेल्या काही दिवसांपासून तिच्याशी गैरवर्तन करत होते. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी तिला आपल्या चेंबरमध्ये बोलावून तिच्याशी गैरवर्तन केलं. यानंतर हे वृत्त हेअर स्ट्रीट पोलीस ठाण्यात पोहोचलं.

लेखी तक्रार दाखल : तक्रारदार राजभवनाच्या शांतता कक्षात काम करतात, असं सांगण्यात आलंय. घटनेची माहिती मिळताच हरे स्ट्रीट पोलीस ठाण्याचे पोलीस राजभवनात पोहोचलेय. फिर्यादीला राजभवन येथून पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय. तेथे त्याच्याकडून लेखी तक्रार घेण्यात आलीय. माहिती मिळताच कोलकाता पोलिसांचे वरिष्ठ पोलिस अधिकारीही पोलीस ठाण्यात पोहोचले. या तक्रारीमुळं प्रशासकीय पातळीवरही खळबळ उडाली आहे.

दोन वेळा केला विनयभंग : राजभवनात काम करणाऱ्या एका महिलेचा दावा आहे की, राज्यपालांनी एकदा नव्हे, तर दोनदा तिचा विनयभंग केला. इतकंच नाही तर राज्यपालांनी तिला विद्यापीठ किंवा राजभवनात कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिल्याचा आरोपही या महिलेनं केला आहे. राजभवनातील शांतता कक्ष कर्मचाऱ्याची ही तक्रार पोलीस गांभीर्यानं घेत आहेत. राज्याच्या घटनात्मक प्रमुखावर यापूर्वी कधीही असे आरोप झाले नव्हते. साहजिकच हा आरोप समोर येताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

राज्यपालांवर होणार कारवाई :या प्रकरणी राज्यपालांवर काय कारवाई होणार का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी अद्याप राज्यपाल किंवा राजभवनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या राजभवनात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गेटसमोर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. याआधीही राज्य सरकारनं विविध मुद्द्यांवरून राज्यपालांशी अनेकदा खडाजंगी केली होती.

हे वाचलंत का :

  1. शरद पवारांनी बारामती वाचवून दाखवावी; बावनकुळेंचं थेट आव्हान - Lok Sabha Election 2024
  2. राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघ ठरवणार खरी शिवसेना कोणाची? 'या' मतदारसंघात दोन शिवसैनिक आमनेसामने - shivsena against shivsena
  3. राज्य महिला आयोगातील 223 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं; 'हे' आहे कारण - Delhi Women Commission

ABOUT THE AUTHOR

...view details