महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा तडकाफडकी राजीनामा - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Banwari Lal Purohit Resigned : पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय. बनवारीलाल पुरोहित यांना 2021 मध्ये पंजाबचं राज्यपाल बनवण्यात आलं होतं.

Banwari Lal Purohit Resigned
Banwari Lal Purohit Resigned

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 6:34 PM IST

चंदीगड Banwari Lal Purohit Resigned : पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राजीनामा राष्ट्रपतींना पाठवला असून, त्यात त्यांनी वैयक्तिक कारणांचा उल्लेख केलाय.

राजीनाम्याचं कारण काय : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या त्यांच्या अधिकृत पत्रात बनवारीलाल पुरोहित यांनी पंजाबचा राज्यपाल तसंच केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या प्रशासकपदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, 'माझ्या वैयक्तिक कारणांमुळं आणि इतर काही वचनबद्धतेमुळं मी पंजाबचा राज्यपाल आणि चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासक पदाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकार करावा.'

कोण आहेत बनवारीलाल पुरोहित : बनवारीलाल पुरोहित यांनी ऑगस्ट 2021 मध्ये पंजाबचे 36 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रविशंकर झा यांनी पंजाब राजभवनात बनवारीलाल पुरोहित यांना पदाची शपथ दिली होती. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी झालेल्या वादामुळं बनवारीलाल पुरोहित चांगलेच चर्चेत होते.

राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात तणाव : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यात अनेकदा वाद झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मान यांनी राज्यपालांवर निशाणा साधत त्यांच्यावर छळवणूक केल्याचा आरोप केला होता. राज्यात आमचं निवडून आलेलं सरकार आहे, असं मान म्हणाले होते. आम्ही निवडलेल्या पद्धतीनं राज्य करू लोकशाहीत निवडणुकीच्या माध्यमातून राज्यकारभार चालतो. भगवंत मान यांनी असंही म्हटलं होतं की, राज्यपाल प्रत्येक गोष्ट म्हणतात की हे बेकायदेशीर आहे आणि ते कायदेशीर आहे. राज्यपालांसोबतच्या त्यांच्या तणावाचं कारण देखील काही विधेयकं होती जी राज्यपालांनी मंजूर केली नव्हती आणि त्याविरोधात मान सर्वोच्च न्यायालयातही गेले होते. यानंतर राज्यपालांनी या विधेयकांना पुन्हा मंजुरी दिली.

तीन वेळा खासदार : बनवारीलाल पुरोहित यांनी 1978 मध्ये नागपूर पूर्व मतदारसंघातून आणि 1980 मध्ये नागपूर दक्षिण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली होती. तसंच 1982 मध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये नगरविकास, झोपडपट्टी सुधारणा आणि गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलंय. यानंतर ते 1984, 1989 आणि 1996 मध्ये तीन वेळा नागपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होते तसंच सर्वाधिक प्रश्न विचारणारे आणि सर्वात सक्रिय लोकसभा खासदार म्हणून त्यांची ओळख होती.

हेही वाचा :

  1. भारतरत्न जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणींची पहिली प्रतिक्रिया; 'या' दोन नेत्यांचे मानले आभार

ABOUT THE AUTHOR

...view details