महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जगन मोहन रेड्डींच्या आलिशान राजवाड्यात 15 लाखाचा कमोड, बेडरूमची किंमत पाहून व्हाल थक्क - Jagan Mohan Reddy House Cost

Jagan Mohan Reddy House Cost : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या राजवाड्याचं काम सुरू आहे. या राजवाड्याचं बांधकाम करण्यासाठी त्यांनी 500 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप आहे. वापरण्यात येणारे महागडे फर्निचर, बल्ब, कमोड विदेशातून त्यांनी आयात केले आहेत, अशी चर्चा आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 6:20 PM IST

Jagan Mohan Reddy House Cost : विशाखापट्टणम रुशीकोंडामध्ये जगनमोहन रेड्डी यांनी सरकारी निधीतून बांधलेल्या राजवाड्याचा खर्च पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. राजवाड्यातील इंटिरिअर आणि फर्निचरच्या वस्तूंची किंमत पाहून सामान्यांचे डोळे फिरताय. आरसा, बाथटब, टॉयलेटमधील कमोड्स, खिडक्यांना वापरलेले पडदे सगळं काही परदेशातून आणलं जातंय. शेवटी, शौचालयात वापरल्या जाणाऱ्या भिंतीवरील पत्रे देखील परदेशी आहेत. अतिशय स्टायलिश पद्धतीनं या राजवाड्याचं बांधकाम त्यांनी केलंय.

आकर्षक झुंबर (ETV BHARAT Reporter)

बेडरूमची किंमत पाहून व्हाल थक्क :रुषिकोंड्यावर बांधलेल्या इमारतींपैकी विजयनगर ब्लॉक नावाच्या तीन इमारती मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाच्या गरजेसाठी बांधल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील बेडरूमची किंमत पाहून तुम्हाला धक्का बसेल. खोलीला हलक्या सोनेरी रंगानं चमकण्यासाठी झुंबर बसवलं आहेत. त्या खोलीतील फरशीसाठी खास युरोपातून ग्रॅनाइट आणलं गेलं. त्यावर संगमरवरी एक खास रचना कोरण्यात आली आहे. त्यात वापरलेले पलंग, गादी, खुर्च्या, टेबल परदेशातून आणले आहेत. या कक्षात बायोमेट्रिक सक्षम वॉर्डरोब बसविण्यात आले आहेत. त्यात आलिशान स्पा आणि टॉयलेट्स आहेत. येथील टॉयलेटमधील कमोड जपानमधून आयात करण्यात आला आहे. त्यातील एका कमोडची किंमत 15 लाखांपर्यंत असण्याचा अंदाज आहे.

अलिशान बाथ टब (ETV BHARAT Reporter)

पाच देशातून आणलं ग्रॅनाइट :रुषिकोंड्यावरील बांधलेल्या राजवाड्यासाठी वापरलेलं ग्रॅनाइट तसंच संगमरवर पाच देशांतून आयात करण्यात आलय. व्हिएतनाम, स्पेन, इटली, नॉर्वे तसंच ब्राझील देशाचा यात समावेश आहे. शयनकक्ष आणि मीटिंग हॉल चमकवण्यासाठी वेगवेगळ्या आकारात ग्रॅनाइटचा वापर केलाय.

बगीचा (ETV BHARAT Reporter)

बाग कामावर 20 कोटींचा खर्च : परदेशातून हजारो रोपे आणून निवासी इमारतींच्या बाहेर बागकाम करण्यात आलंय. त्यात सुंदर विद्युत सजावट देखील करण्यात आली आहे. यासाठी 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. खोल्यांमध्ये विजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची किंमत प्रत्येकी अडीच लाख आहे. या सर्व वस्तू परदेशातून आयात करण्यात आल्या आहेत.

राजवाड्यातील बेडरूम (ETV BHARAT Reporter)

एका बल्बची किंमत 60 हजार : घराच्या बाहेरील भिंतीभोवती सजावटीसाठी वापरलेले विद्युत दिवे दिल्लीहून आणले आहेत. प्रत्येक बल्बची किंमत 60 हजार रुपये आहे. असे शेकडो दिवे तिथ लावण्यात आले आहेत. याशिवाय सुशोभीकरण, सजावटीच्या दिव्यांबरोबरच घरामध्ये सुमारे चार हजार दिव्यांची आरास करण्यात आलीय.

पंखे :जगनमोहन रेड्डी राहत असलेल्या इमारतींमध्ये फुलाच्या आकारात दोन प्रकारचे पंखे वापरले आहेत. त्यातील प्रत्येकाची किंमत लाखाच्या घरात आहे.

कमोड :माजी मुख्यमंत्र्यांच्या दालनव्यतिरिक्त इतर इमारतींमध्ये बसवलेल्या प्रत्येक कमोडची किंमत रु. 88 हजार आहे.

'हे' वाचलंत का :

  1. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं वैशिष्ट्य काय? जाणून घ्या, सविस्तर - Nalanda University
  2. एकनाथ शिंदे यांचे बंड ते लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत शिवसेनेत काय वादळे आली? जाणून घ्या सविस्तर - Shiv Sena Foundation Day 2024
  3. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून वर्धापनदिनानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन; विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार? - Shiv Sena Foundation Day 2024

ABOUT THE AUTHOR

...view details