हैदराबाद : बांगलादेश आणि म्यानमारमधील तरुणींना भारतात आणून त्यांना वाममार्गाला लावणाऱ्या मानवी तस्करीचं रॅकेट हैदराबाद पोलिसांनी उघड केलं. तस्करी करण्यात आलेल्या तरुणी आणि महिलांना त्यांच्या वयाप्रमाणं भाव ठरवण्यात येतात. त्यानंतर त्यांना दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, चेन्नई आणि विशाखापट्टण सारख्या देशाच्या विविध शहरात पाठवलं जाते, असा धक्कादायक खुलासा पोलीस तपासातून उघड झाला आहे. कोलकाता इथून चालणाऱ्या या मानवी तस्करीच्या रॅकेटचा हैदराबाद पोलिसांनी पर्दापाश केला. त्यामुळे हैदराबाद पोलिसांचं मोठं कौतुक करण्यात येत आहे.
हैदराबाद पोलिसांनी केली 7 तरुणींची सुटका : हैदराबाद पोलिसांच्या सिटी टास्क फोर्सला एका संशयित मानवी तस्करी केंद्राबाबत खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानंतर सिटी टास्क फोर्सच्या पोलिसांनी या संशयित मानवी तस्करी केंद्रावर छापा मारला. यावेळी पोलिसांनी तीन अल्पवयीन तरुणींची सुटका केली. यावेळी हैदराबाद पोलीस दलातील जवानांनी अटक केलेल्या तस्करांची कसून चौकशी केली. यावेळी कोलकाता इथून राष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मानवी तस्करीची धक्कादायक माहिती उघड करण्यात हैदराबाद पोलिसांना यश आलं.
मानवी तस्करांची कशी आहे 'मोडस ऑपरेंडी' : मानवी तस्कर तरुणींना बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये घेऊन जातात. पश्चिम बंगालमध्ये तस्करी केलेल्या तरुणींना सर्वाधिक किंमत घेऊन दलालांच्या हवाली केलं जाते. काही तस्कर तरुणींच्या कुटुंबीयांना अल्पवयीन मुलींसाठी 20 हजार रुपये आणि तरुणींसाठी 35 हजार रुपये देतात. भारतात विलासी जीवन जगण्याचं आश्वासन देऊन आमिष दाखवतात. काही जण रोजगाराच्या आशेनं अशा मानवी तस्करांना बळी पडतात. भारतात आणल्यानंतर या तरुणींना ब्युटी पार्लर, मसाज सेंटर, वेश्यालय आणि हॉटेलमध्ये पाठवलं जाते. कोलकातामध्ये बनावट आधार आणि मतदार ओळखपत्रं तयार केली जातात. त्यामुळे त्यांना दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, चेन्नई आणि विशाखापट्टणम सारख्या प्रमुख शहरांमध्ये नेण्यापूर्वी खोटी भारतीय ओळखपत्रं दिली जातात. कोलकातामधील दलाल प्रत्येक मुलीसाठी 1-2 लाख रुपये आकारतात. या तरुणींना डेटिंग अॅप ऑपरेटर, स्पा सेंटर आणि वेश्यालय व्यवस्थापकांना विकतात. त्यानंतर या तरुणींचं शोषण करण्यात येते.
तस्करांच्या चक्रात अडकलेल्या तरुणींचं वारंवार स्थलांतर : बांगलादेशमधून कोलकाता इथं तस्करी करुन आणलेल्या तरुणी गरिबी आणि इतर कारणातून या चक्रात अडकतात. सुरुवातीला महागडे कपडे आणि विलासी जीवनशैलीमुळे आकर्षित होतात, मात्र त्यांना नंतर यामधील वास्तव कळते. मानवी तस्कर त्यांचा शोध लागू नये म्हणून दर आठवड्याला या तरुणींचं स्थलांतर करतात. वेश्यालय चालवणारे त्यांना त्यांच्या कमाईनुसार कमिशन आणि 20 ते 30 हजार रुपये मासिक पगार देतात. हैदराबाद पोलिसांनी सुटका केलेल्या एका पीडितेनं आपली आपबिती कथन केली. "मला फक्त माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करायचं होतं, पण मी कधीच कल्पना केली नव्हती की मी इथंच संपेन," असं तिनं सांगितलं.
हैदराबाद पोलिसांनी पीडितांना मायदेशी पाठवण्याचे प्रयत्न : हैदराबाद पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत बांगलादेश आणि म्यानमारमधून तस्करी करण्यात आलेल्या 40 तरुणी आणि 10 अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. सध्या या व्यापारात आणखी किमान 50 पीडित अडकल्याची शक्यता पोलीस अधिकारी वर्तवत आहेत. सुटका करण्यात आलेल्या पीडितांची ओळख पटवून त्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :