पटनाINDIA alliance :बिहारचे मुख्यमंत्री तथा JDU अध्यक्ष नितीश कुमार इंडिया आघाडीपासून दूर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयूचे अध्यक्ष झाल्यानंतर नितीश कुमार यांचं पक्षावर पूर्ण नियंत्रण आहे, त्यामुळं ममता बॅनर्जी यांच्या सारखाच ते इडिया आघाडीला धक्का देऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या चर्चेचं उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी खंडन केलंय.
"आम्ही सरकारमध्ये आहोत. ते नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत. मी उपमुख्यमंत्री आहोत. आम्ही नियमितपणे बैठका घेतो. सरकारी कामांबाबत बैठका होतात. मग विरोधकांना काय अडचण आहे. आम्ही ताकदीनं एकत्र काम करत आहोत. तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा. तुम्ही जे प्रश्न विचारत आहात त्यात कोणतीही वास्तविकता नाही. महाआघाडीत सर्व काही ठीक आहे." -तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री
बॅनर्जींंचा स्वंबळावर निवडणूक लढवणार : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वंबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यामुळं आता बिहारचे मुख्यमंत्री काय भूमीका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 30 जानेवारीला बिहारच्या पूर्णिया येथे होणारी राहुल यांची प्रस्तावित रॅली विरोधी ऐक्याचं प्रतिक म्हणून पाहिली जात होती. RJD, JD-U तथा डावे पक्ष यांसारख्या सर्व काँग्रेस मित्रपक्षांनी 30 जानेवारीच्या रॅलीला हजेरी लावणे अपेक्षित होतं.
नितीश कुमार इडिया आघाडीतून बाहेर पडणार : तथापि, गुरुवारी नितीश कुमार इडिया आघाडीतून बाहेर पडतील, पूर्णिया रॅलीत ते सहभागी होणार नाहीत, अशी चिंता काँग्रसला होती. यासंदर्भात एका माजी केंद्रीय मंत्र्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, मला आश्चर्य वाटतं की नितीश कुमार अजूनही आमच्यासोबत कसे आहेत?. ते ममता बॅनर्जींच्या मार्गावर जातील, अशी चिंता पक्षात आहे. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींची जाहीर स्तुती केल्यानं पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे. जर नितीश कुमारांनी इंडिया आघाडी सोडण्याचा निर्णय घेतला, तर नितीश कुमार निश्चितपणे भाजपासोबत निवडणूकपूर्व युती करतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.