महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जेल के ताले टूटेंगे, केजरीवाल-सिसोदिया सत्येंद्र जैन छूटेंगे! तुरुंगाबाहेर येताच 'आप' नेते संजय सिंह गरजले - Sanjay Singh Out Of Jail

Sanjay Singh Out Of Jail : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह अखेर तुरुंगातून आज बुधवार (दि. 3 एप्रिल) रोजी सायंकाळी सहा वाजता बाहेर आले. बाहेर येताच संजय सिंह यांनी आपलं आक्रमक रुप दाखवलं आहे. कार्यकर्त्यांनी उत्साह साजरा केल्यावर त्यांनी ही वेळ आनंदोत्सव साजरा करण्याची वेळ नाही. (Sanjay Singh) ही संघर्षाची वेळ आहे असं म्हणत लवकरचं अरविंद केजरीवाल, सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया तुरुंगातून बाहेर येतील अशी घोषणाबाजी केली.

तुरुंगाबाहेर येताच आप नेते संजय सिंह
तुरुंगाबाहेर येताच आप नेते संजय सिंह

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 10:33 PM IST

नवी दिल्ली :Sanjay Singh Out Of Jail : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांची आज तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. संजय सिंह सहा महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. (excise policy case) तसंच, गाडीच्या टपावरून उपस्थित कार्यकर्त्यांना ही आनंदोत्सव साजरा करण्याची वेळ नाही. हा संघर्षाचा काळ आहे. तुरुंगाचे कुलूपं लवकरचं तुटतील आणि अरविंद केजरीवाल, सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया तुरुंगातून सुटतील अशी जोरदार घोषणाबाजीही त्यांनी यावेळी केली. यावेळी तुरुंगाबाहेर संजय सिंह यांच्या स्वागताला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

अबकारी धोरण प्रकरणात जामीन मंजूर : काल मंगळवार (दि. 2 एप्रिल) रोजी सुप्रीम कोर्टाने त्यांना दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संजय सिंह यांची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. (Bail to Sanjay Singh) जामिनाच्या अटी कनिष्ठ न्यायालय ठरवेल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटले होतं. त्यानुसार संजय सिंह यांना नियम आणि आटी घालण्यात आल्या आहेत.

प्रवासाच्या कार्यक्रमाची माहिती द्वी लागणार : आज बुधवार ट्रायल कोर्टाने संजय सिंह यांना त्यांचा पासपोर्ट जमा करण्याचं सांगितलं. तसंच, दिल्लीच्या बाहेर जाण्यापूर्वी त्यांच्या प्रवासाच्या कार्यक्रमाची माहिती देण्याचं आणि त्याच्या फोनचं 'लोकेशन' नेहमी चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने संजय सिंग यांना 2 लाख रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि तेवढीच रक्कम सुरक्षा ठेव जमा करण्याचे निर्देशही दिले आहेत.

नियम आणि अटी :

  • संजय सिंह यांना त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागेल. ते फक्त दिल्ली-एनसीआरमध्येच राहतील.
  • ईडीच्या तपासावर भाष्य करणार नाहीत. पुराव्यांशी छेडछाड करणार नाही. तपासात सहकार्य करावे लागेल.
  • मोबाईल नंबर तपास अधिकाऱ्यांना द्यावा लागेल. तसंच, तपासात सहकार्यही कराव लागेल.
  • सुप्रीम कोर्टाने म्हटल्याप्रमाणे मद्य प्रकरणातील भूमिकेबाबत भाष्य करता येणार नाही.
  • दिल्ली सोडण्याअगोदर संबंधीत अधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागेल.

हेही वाचा :

1

2

3

ABOUT THE AUTHOR

...view details