महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'ऐकावं ते नवलच'! 30 श्वानांच्या उपस्थितीत 'हँडसम'चा वाढदिवस साजरा - diners park dog party

Birthday party of Dog : इंदूरच्या डायनर्स पार्कमध्ये एका श्वानाचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. येथे वाढदिवसानिमित्त मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या श्वानाचं नाव 'हँडसम' असं आहे. यावेळी सुमारे 30 लोक आपले पाळीव श्वान घेऊन उपस्थित होते.

इंदोरमध्ये कुत्र्याचा वाढदिवस साजरा
इंदोरमध्ये कुत्र्याचा वाढदिवस साजरा

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2024, 5:16 PM IST

कुत्र्याचा वाढदिवस साजरा

इंदोर : Birthday party of Dog :घराघरात कुटुंबातील सर्व सदस्यांचे वाढदिवस साजरे होण्यात नवलाई नाही. इंदोर येथेही एका कुटुंबाने आपल्या घरातील सदस्याचा वाढदिवस साजरा केला. फरक इतकाच की, हा सदस्य म्हणजे त्यांचा पाळीव श्वान आहे. इंदोर येथील एका कुटुंबाने आपल्या 'हँडसम' नावाच्या पाळीव श्वानाचा वाढदिवस साजरा केला. या कुटुंबाने येथील मोठ्या हॉटेलमध्ये मोठी पार्टी आयोजित केली. सेलिब्रेशनच्या रिवाजानुसार त्यांच्या या लाडक्या श्वानाच्या वाढदिवसानिमित्त केकही कापण्यात आला. बर्थ डे म्हटला म्हणजे 'बर्थ डे बॉय' च्या मित्र-मैत्रिणींची उपस्थिती नको! हा प्रसंग सुमारे 30 श्वानांनी एकत्र येऊन धम्माल साजरा केला. दरम्यान, शहरातील या अनोख्या 'डॉग पार्टी'मध्ये केवळ केक कापल्यानंतर 'हँडसम'ने पार्टीत आलेल्या सर्व कुत्र्यांना रिटर्न गिफ्ट पॅक आणि खास श्वानांसाठीचं स्वादिष्ट खाद्य देखील वितरित केलं.

श्वानाला अंघोळही घालण्यात आली : ही पार्टी आकांक्षा राय नावाच्या प्राणीप्रेमी महिलेनं तिच्या 'हँडसम' नावाच्या श्वानाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली होती. गोल्डन रिट्रीव्हर जातीचा हा श्वान त्यांच्यासाठी अपत्यासारखा आहे. वाढदिवसानिमित्त त्याची औक्षणही करण्यात आलं. त्यानंतर श्वानाला खजराना मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आलं. यानंतर 'हँडसम' नावाच्या कुत्र्याला डॉग पार्लरमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर सायंकाळी त्याचं ग्रूमिंग करून शहरातील 'डायनर्स पार्क' हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला.

श्वानाबरोबर अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी : 'हँडसम'चे 30 श्वान दोस्तही 'डायनर्स पार्क' मध्ये सेलिब्रेशनसाठी हजर होते. केक कापल्यानंतर सर्व कुत्र्यांनी वाढदिवसाच्या गाण्यावर मस्ती केली. यालेळी श्वानांसाठीचे अनेक खेळही आयोजित केले गेले. पार्टी आयोजक आकांक्षा रॉय यांनी सांगितलं की, त्या कुत्र्याला आपल्या मुलाप्रमाणे मानतात. त्यांचा श्वानही त्यांच्याबरोबर दौऱ्यावर जातो. अलीकडेच त्या कुत्र्यासोबत मनाली टूरवर गेली होती. 14 तास ड्रायव्हिंग केली. याशिवाय त्यांचे कुटुंबीयही त्यांच्या श्वानाबरोबर अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात.

ABOUT THE AUTHOR

...view details