महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कुटुंब आहे की 'अख्खं गाव'; एकाच घरात आहेत 110 मतदार, मतं मिळवण्यासाठी उमेदवारांची होते धडपड - Chandel Family Patna - CHANDEL FAMILY PATNA

Chandel Family Patna : पाटणा इथं एकाच कुटुंबात तब्बल 165 सदस्य आहेत. या घरात 110 नागरिकांचं मतदान आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील मतदारांची एकगठ्ठा मतं मिळवण्यासाठी उमेदवारांची मोठी धडपड सुरू आहे.

Chandel Family Patna
पाटण्यातील चंदेल कुटुंब (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 10:23 AM IST

पाटण्यातील चंदेल कुटुंब (ETV Bharat)

पाटणा Chandel Family Patna : देशात लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. पाटण्यात 1 जूनला मतदान पार पडणार आहे. मात्र पाटणा साहिब लोकसभा मतदार संघातील लोहणीपूर गावातील चंदेल निवास इथं उमेदवारांची वेगळीच धडपड सुरू असल्याचं दिसून येत आहे. त्याला कारणंही तसंच आहे. 'चंदेल निवास' या एकाच घरात तब्बल 110 मतदार आहेत. त्यामुळे चंदेल निवासातील मत प्रत्येक उमेदवारांसाठी निर्णायक ठरत असल्याचं बोललं जाते.

पाटण्यातील चंदेल कुटुंब (ETV Bharat)

निवडणूक काळात चंदेल निवास चर्चेत : पाटणा इथल्या लोहणीपूर गावात 'चंदेल निवास' आहे. या चंदेल निवासात तब्बल 110 मतदार असल्यानं उमेदवारांचं भवितव्य ठरवण्याची क्षमता चंदेल निवासातील मतदारांमध्ये आहे. चंदेल निवासातील मतदार अत्यंत जागरुक आहेत. त्यासह सुशिक्षित आहेत. त्यामुळे मत देण्यापूर्वी ते एकमेकांशी चर्चा करतात. त्यानंतर एका उमेदवारावर एकमत झाल्यानंतर त्याला मत देतात. त्यामुळे चंदेल निवासातील मतं मिळवण्यासाठी उमेदवारांची धडपड असते. यावेळी चंदेल निवासातील मतदारांची नावं दोन मतदान केंद्रांतील मतदार यादीत आहेत. काहींची नावं बूथ क्रमांक 153 वर आहेत, तर काहींची नावं 183 वर आहेत.

पाटण्यातील चंदेल कुटुंब (ETV Bharat)

चंदेल निवास ही एक मोठी व्होट बँक :चंदेल निवास ही एक मोठी व्होट बँक आहे. त्यामुळेच सकाळपासून सायंकाळपर्यंत उमेदवारांसह त्यांचे समर्थक उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी चंदेल निवासच्या दारात चकरा मारतात. यावेळी 10 नवीन मतदार कुटुंबात सामील झाले आहेत. यात 6 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. चंदेल निवास कुटुंबातील आदर्श कुमार सिंह हे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. यावेळी त्यांनी "मी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. यावेळी रोजगार आणि विकास हा मुख्य मुद्दा आहे. निवडणुकीपूर्वी घरी मिनी निवडणूक घेतली जाते. यामध्ये उमेदवारांकडं कल निर्माण होतो. पण जेव्हा मतदानाचा प्रश्न येतो, तेव्हा प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार मतदान करतो. कुटुंबातील सदस्य आपल्या मर्जीनं मतदान करतात."

पाटण्यातील चंदेल कुटुंब (ETV Bharat)

चंदेल कुटुंबात आहेत 165 जणं :चंदेल कुटुंबातील सदस्य अमित गौतम म्हणाले की, "मी नेहमीच राष्ट्रहित आणि विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करतो. प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार विरोधी उमेदवारांना मतदान करण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र विधानसभा आणि नगरपंचायत निवडणुकीत सर्व सदस्यांची मतं एकाच उमेदवाराला जातात." चंदेल कुटुंबात एकूण 165 जणं आहेत, त्यापैकी 35 जणं बाहेर राहतात. काही परदेशात राहतात, तर काही मुंबई, दिल्ली, नोएडासारख्या शहरात राहतात. कुटुंबात एकूण 110 मतदार आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांना लोकशाही मूल्यांची जाण आहे. कुटुंबात 24 अभियंते, दोन डॉक्टर, 4 न्यायिक सेवेत आणि दोन डझनहून अधिक सदस्य कॉर्पोरेट नोकरीत आहेत. कुटुंबातील महिलाही मोठ्या संख्येनं नोकरी करतात.

पाटण्यातील चंदेल कुटुंब (ETV Bharat)
पाटण्यातील चंदेल कुटुंब (ETV Bharat)

मूळचं वैशालीचं आहे चंदेल कुटुंब :कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य अरुण कुमार सिंह यांनी सांगितलं की, "1974 मध्ये त्यांनी पाटणा इथं जमीन खरेदी केली. माझ्या वडिलांना दोन भाऊ असून ही जमीन दोन्ही भावांसाठी संयुक्तपणे खरेदी केली. आम्ही मूळचे वैशाली जिल्ह्यातील राघोपूरचे असून तिथं चांगली जमीन आहे. त्यावेळी पाटण्यातील ही जमीन कोथिंबिरीचं पीक विकून खरेदी केली."

पाटण्यातील चंदेल कुटुंब (ETV Bharat)

हेही वाचा :

पाटण्यातील चंदेल कुटुंब (ETV Bharat)
  1. "बाळासाहेब असते तर यांना जोड्यांनी बडवलं असतं", मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल - CM Eknath Shinde Interview
  2. समाज माध्यमांवर व्हायरल होणारे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रातील नाहीत; राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण - Lok Sabha Election 2024
  3. राज्यातील 48 मतदारसंघांत कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details