युगेंद्र पवार म्हणाले, "पवारांना साथ दिली तशी मलाही..." - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 28, 2024, 1:26 PM IST
पुणे : राज्याचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात आज (28 ऑक्टोबर) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर दुसरीकडं राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत युगेंद्र पवार हे देखील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळं बारामतीत पुन्हा एकदा काका-पुतण्याच्या लढाईत कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुकाचं ठरेल. याच पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी युगेंद्र पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "बारामतीची जनता नेहमीचं शरद पवारांसोबत उभी राहिलीय. शरद पवार 27 वर्षांचे असताना बारामतीच्या जनतेनं त्यांना जशी साथ दिली, तशीच साथ ते मलाही देतील", असा विश्वास देखील युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला.