घड्याळ चिन्हावरच नाशिक लोकसभा निवडणूक लढली जाईल - छगन भुजबळ - Lok Sabha elections
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 27, 2024, 7:48 PM IST
पुणे Lok Sabha elections : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून राज्यात महायुती तसंच महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार आहे. राज्यात भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट) यांचा महायुतीमध्ये समावेश आहे. तसंच भाजपानं लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं तटकरे सोडले तर अद्याप इतर उमेदवार जाहीर केलेले नाही. नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक मतदार संघाची आपण निवडणूक लढवायला हवी, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं नाशिक मतदारसंघात घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला हवी, असं आमचं मत आहे. माझ्या नावाच्या उमेदवारीची चर्चा सुरू असली, तरी अद्याप काहीही ठरलेलं नाही, असं भुजबळ म्हणाले.