'माझ्यासमोर कोणीही उमेदवार असला तरी मी अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येणारच'; खासदार विनायक राऊतांचा विश्वास - Vinayak Raut - VINAYAK RAUT
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 30, 2024, 11:44 AM IST
रत्नागिरी Vinayak Raut : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत. अशातच रत्नागिरीचे खासदार विनायक राऊतांनी आपल्या विजयाचा दावा केलाय. ते म्हणाले, "महाविकास आघाडीच्या सर्वच घटकांनी मला अडीच लाखाच्या मताधिक्यानं निवडून देण्याचा निर्धार केलेला आहे. त्यामुळं माझ्यासमोर कोणीही उमेदवार असला तरी मी अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येणारच." तसंच कोकणवासियांशी असलेलं माझं नातं नेत्याचं किंवा खादाड माणसाचं नाही, तर कोकणवासियांनी मला मनापासून स्वीकारलेलं आहे. त्यामुळं यावेळी त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील याची मला खात्री असल्याचा विश्वास खासदार विनायक राऊतांनी म्हटलंय. विशेष म्हणजे विनायक राऊतांना अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यापुर्वीच त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.