लोकसभा निवडणूक 2024; प्रचारात विजय वडेट्टीवारांनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-04-2024/640-480-21246333-thumbnail-16x9-vijay-wadettiwar.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Apr 17, 2024, 3:39 PM IST
गडचिरोली Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान (Namdev Kirsan) यांच्या प्रचारार्थ आज संपूर्ण गडचिरोली शहरातून रॅली काढण्यात आली. उन्हाच्या झळा लागत असूनही काँग्रेसनं धडाक्यात प्रचार केला. या रॅलीचं नेतृत्व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलं. हातात काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन त्यांनी रॅलीची सुरुवात केली. इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी देखील विजय वडेट्टीवार यांना साथ दिली, त्यांनी देखील पक्षाचा झेंडा घेऊन नृत्यात सहभाग घेतला. तरुण-तरुणींच्यासोबत वडेट्टीवारांनी मांदरी वाद्य वाजवत नृत्य (Tribal Dance) करण्याचा आनंद लुटला.
यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस महेंद्र ब्राह्मणवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भाऊ कात्राटवार, आरपीआय नेते ॲड. राम मेश्राम, रोहिदासजी राऊत, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद माजी पदाधिकारी, युवक काँग्रेस महिला आघाडी काँग्रेस इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचे तथा घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते.