वैशाख पौर्णिमेनिमित्त 'दगडूशेठ' बाप्पांना तब्बल 5 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य - Dagadusheth Ganpati Temple - DAGADUSHETH GANPATI TEMPLE
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 23, 2024, 11:09 AM IST
पुणे Pune Dagadusheth Ganpati Temple : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आज (23 मे) मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आलाय. गणपती बाप्पांना तब्बल 5 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली. आज पहाटे 3 वाजता ब्राह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे 4 वाजता प्रख्यात गायक डॉ. अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी आणि छोटे उस्ताद फेम श्रेया मयुराज यांचा स्वराभिषेक कार्यक्रम सादर केला. त्यानंतर गणेशयाग पार पडला आहे. सूर्योदय समयी पुष्टीपती विनायक जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी गणरायाला अर्पण करण्यात येतो. तसंच दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना या शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे.