ठाण्यात श्वानावर अनैसर्गिक अत्याचार, 1 जुलैपासून कायद्यात केलेल्या बदलामुळं प्राणी प्रेमी नाराज - Unnatural abuse on a dog - UNNATURAL ABUSE ON A DOG
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 5, 2024, 9:18 AM IST
ठाणे Unnatural Abuse On a Dog : ठाण्यात एका भटक्या श्वानावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी वर्तक नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात तक्रार नोंदवण्यात आली. या घटनेवरुन प्राणीप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, 1 जुलैपासून नव्यानं लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेमध्ये प्राण्यांवरील अनैसर्गिक लैंगिक अत्याचारासंदर्भातील कलमाचा सामावेश नाही. त्यामुळं यापुढं आता कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करणार, असा प्रश्न प्राणीप्रेमी संघटनांकडून विचारला जात आहे. "श्वानावरील लैंगिक अत्याचाराची घटना 28 जूनला घडली होती. त्यामुळं भारतीय दंड संहितेनुसार याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात चाल-ढकल केली. त्यामुळं 1 जुलैपूर्वी गुन्हा दाखल होऊ शकला नाही," असा आरोप ॲनिमल वेल्फेअर ऑफिसर शुशांक तोमर यांनी केलाय.