आमदाराच्या गाडीसमोर ट्रक झाला पलटी; आमदार संजय गायकवाड आले मदतीला धावून, पाहा व्हिडिओ - Truck Accident - TRUCK ACCIDENT
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 6, 2024, 8:54 PM IST
बुलढाणा Truck Accident : जिल्ह्यातील अजिंठा घाटामध्ये एक मालवाहू ट्रक भरधाव वेगाने जात होता. अचानक वळणावर ट्रकचालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हे आज दुपारी जळगाव खान्देश येथे जात असताना त्यांच्या समोरच हा अपघात घडला. या अपघातामध्ये एक कार आणि दुचाकीस्वार थोडक्यात बचावलेत. हा अपघात संजय गायकवाड यांच्या डोळ्यासमोर घडला. त्यांनी तत्काळ वाहनाजवळ जाऊन त्या वाहनातील ड्रायव्हरला सुखरुप बाहेर काढलं. ड्रायव्हरला पुढील प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं. विशेष म्हणजे ट्रक पलटी होण्याच्या काही क्षण आधीच तिथून दोन दुचाकी स्वार आणि एक कार जात होती. यात ते देखील बचावले आहेत. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या थरारक घटनेचा व्हिडिओ आमदार गायकवाड यांच्या गाडीच्या कॅमेऱ्यात कैद झालाय.