बीडच्या विडा गावची धूलीवंदनाची परंपरा लय भारी; जावयाची काढली जाते गावभरं गाढवावरुन स्वारी - Vida Village Holi - VIDA VILLAGE HOLI
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 25, 2024, 10:44 PM IST
|Updated : Mar 25, 2024, 10:55 PM IST
बीड Vida Village Holi : बीडच्या केज तालुक्यातील विडा येथे धूलीवंदन साजरी करण्याची आगळी-वेगळी परंपरा राज्यभरात विशेष आहे. या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची ही परंपरा साधारणतः 80 वर्षांपासून अद्यापही अखंडीतपणे सुरू आहे. इतर वेळी जावाई म्हटला की, वेगळाच थाट असतो. परंतू धुलीवंदनाच्या दिवशी विडा गावच्या जावयाची गळ्यात चप्पल-बुटाचा हार घालून रंगाची उधळण करत गाढवावरून वाजत-गाजत जल्लोषात गावभर मिरवणूक काढली जाते. हा धूलीवंदनाचा उत्सव सर्वांना आनंद देऊन जातो. या उत्सवात गावातील सर्व जाती-धर्माचे नागरिक सहभागी होतात. हा उत्सव प्रसार माध्यमांचे लक्ष वेधून घेणारा ठरत आहे.
संतोष जाधव यांना मान : होळीच्या सणाची चाहूल लागल्याने विडेकर जावयाच्या शोधात असतात. यावर्षीच्या सोमवारच्या गदर्भ स्वारीचा मान संतोष जाधव या जावयाला मिळाला. हा परंपरागत उत्सव पार पाडण्यासाठी सरपंच सुरज पटाईत, उपसरपंच सदाशिव वाघमारे, गोविंद देशमुख, राजेभाऊ घोरपडे, महादेव पटाईत, शहाजी घुटे, नारायण वाघमारे यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
काय आहे परंपरा? : ही परंपरा ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या काळापासून सुरू आहे. त्यावेळी त्यांचे जावाई होळीच्या दिवशी सासरी आले असता, त्यांना ग्रामस्थांनी धुलीवंदनाच्या दिवशी गाढवावर बसवून मिरवणूक काढली होती. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आहे.