तलाठी भरतीच्या नावानं 1 कोटी 14 लाखांचा गंडा, सरकारी अधिकाऱ्यासह चार जणांना अटक - CASH FOR JOB SCAM
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 13, 2024, 11:02 AM IST
नांदेड : तलाठी पदासह कामगार आयुक्त यांच्याकडून भरण्यात येणाऱ्या जागांवर नोकरीचं आमिष दाखवून मुखेड तालुक्यातील 16 जणांना 1 कोटी 14 लाख रुपयांनी गंडविण्यात आलंय. याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 जणांना पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे. मुखेड येथील केंद्रप्रमुख पदावर कार्यरत असलेले गोविंद गिरी यांना त्यांच्या ओळखीतील जावेद तांबोळी यानं नोकरीचं आमिष दाखवलं. गोविंद गिरी यांनी आपल्या दोन मुलांना तलाठी भरतीच्या माध्यमातून नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी 10 लाख असे 20 लाख रुपये दिले. इतकंच नाही तर त्यांनी याविषयीची माहिती आपल्या नातेवाईकांसह अन्य ओळखीच्या लोकांना दिली. त्यानंतर एकूण 16 जणांनी 1 कोटी 14 लाख रुपये आरोपींना दिले. त्यानंतर तलाठी पदाच्या परीक्षेचा निकाल लागला. मात्र त्यात यातील एकाचंही नाव नव्हतं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गोविंद गिरी यांनी मुखेड पोलीस ठाण्यात धाव घेतली. गिरी यांच्या तक्रारीवरुन कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी पवन कुमार चव्हाण यांच्यासह जावेद तांबोळी, कल्पेश जाधव, रामदास शिंदे या चार जणांना अटक करण्यात आलीय. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.