मतदार जनजागृतीसाठी 2 हजार विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारला भारताचा नकाशा, पाहा व्हिडिओ - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 14, 2024, 10:59 PM IST
सातारा Voter Awareness : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत प्रत्येकानं मतदान करून आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं, यासाठी प्रशासनाकडून जनजागृतीचे उपक्रम राबविले जात आहेत. असाच एक उपक्रम शनिवारी साताऱ्यातील कराड आणि फलटणमध्ये झाला. कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर तब्बल 2 हजार विद्यार्थ्यांनी भारताचा नकाशा साकारून मतदान जनजागृती केली. याच पध्दतीनं फलटणमधील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा साकारत मतदान करण्याचं आवाहन केलं. या उपक्रमासाठी प्रशासनानं खास परिपत्रक काढलं होतं. ज्या शाळांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आलं होतं, त्यांना शंभर टक्के उपस्थिती दर्शवण्याचं आदेशित केलं होतं. आदेशात कसूर झाल्यास लेखी खुलासा मागितला होता. त्यामुळं विद्यार्थी, शिक्षक आणि महसूल अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मतदार जनजागृतीचा उपक्रम पार पाडला.