जळगावात महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन, जयंत पाटलांनी काढली भाजपाची खरडपट्टी - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 24, 2024, 6:17 PM IST
जळगाव Lok Sabha Election 2024 : जळगाव तसंच रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते जळगावात आले आहेत. महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील तसंच करण पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तसंच महायुतीकडून भाजपाच्या रक्षा खडसे, स्मिता वाघ 25 तारखेला म्हणजे उद्या अर्ज भरणार आहेत. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आज 24 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन होत आहे. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आमदार शिरीष चौधरी उपस्थित आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आमदार जितेंद्र आव्हाड आम्ही विकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी आलो आहोत. आमचे दोन्ही उमेदवार विजयी होतील, याची आम्हाला खात्री आहे, असं यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्राचा भाजपा सरकारविरुद्ध प्रचंड राग आहे. दुर्दैवानं भाजपा राष्ट्रीय प्रश्नांकडं दुर्लक्ष करून जातीयवादाच्या गोष्टी करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेद्र आव्हाड यांनी केलीय.