पिंपळ पानावर साकारलं प्रभू श्रीराम आणि साईबाबांचं चित्र; पाहा व्हिडिओ - ram painting on pimpal
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 21, 2024, 9:08 PM IST
शिर्डी Shree Ram and Saibaba Painting : अयोध्येत होत असलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं विविध क्षेत्रातील कलाकार आपली कला साकारत आहेत. अशाच शिर्डीतील एका कलाकारांनं पिंपळ पानावर श्रीरामाचं चित्र काढत आपली कला सादर केलीय. शिर्डीतील अमोल निर्मळ या कलाकारांनं पिंपळ पानावर प्रभू श्रीराम यांचं अतिशय सुंदर चित्र साकारलं आहे. त्याचबरोबर अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती आणि साईबाबांचं चित्र साकारलं आहे.
पिंपळ पानावर रेखाटलं चित्र : विविध क्षेत्रातील कलाकार आपली कला सादर करत, श्रीरामांप्रति असलेली श्रद्धा कलेच्या माध्यमातून अर्पण करत आहेत. मी देखील एक कलाकार असल्यानं माझी साईबाबा आणि श्रीराम यांच्यावर श्रद्धा आहे. त्यामुळं मी माझ्या कलेतून प्रभू श्रीराम आणि साईबाबाचं चित्र पिंपळ पानावर चित्र काढलंय आणि ते पान साईबाबांच्या चरणी अर्पण केल्याचं अमोल निर्मळ यांनी सांगितलंय.