शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर 'स्वराज्याचं शस्त्रागार' संकल्पना, शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास प्रारंभ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

बुलढाणा : Shivjayanti 2024  : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुलढाण्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिजामाता प्रेक्षागारच्या मैदानावर 'स्वराज्याचे शस्त्रागार' या संकल्पनेतून शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या शस्त्र प्रदर्शनात धनुष्यबाण, तलवार, भाले यासह शिवकालीन नावीन्यपूर्ण शस्त्रं ठेवण्यात आली आहेत. राकेश राव यांनी यावेळी उपस्थितांना या शस्त्रांची सविस्तर माहिती दिली आहे. दोन दिवस हे शस्त्रप्रदर्शन सुरू राहणार आहे. दरवर्षी बुलढाण्यात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनx हे शस्त्र प्रदर्शन भरवण्यात येतs. या शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून युवा वर्गासह शाळकरी मुलांना आपला देदीप्यान इतिहास तसंच संस्कृतीची माहिती व्हावी, हा उद्देश असल्याचं येथील राकेश राव यांनी सांगितल. तसंच, विद्यार्थ्यांना प्रदर्शनातील शस्त्रांची माहितीही देण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.