नागपुरात शिवजयंतीचा उत्साह; ढोल-ताशा पथकाकडून शिवरायांना मानवंदना, पाहा व्हिडिओ - Shiv Jayanti 2024 Celebration
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/19-02-2024/640-480-20785091-thumbnail-16x9-shiv-jayanti-2024.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 19, 2024, 10:56 AM IST
नागपूर Shiv Jayanti 2024 : आज महाराष्ट्रचं नाही तर संपूर्ण देशभरात शिवजयंती सोहळा प्रचंड उत्साहात साजरा होताना दिसत आहे. राज्याच्या उपराजधानी नागपुरात देखील शिवजयंतीचा उत्साह दिसून येतोय. महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यासाठी शिवभक्तांची रिघ लागली होती. यावेळी ढोल-ताशा पथकांकडून महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. अनेक वर्षांपासून महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानातर्फे शिवजयंती निमित्य विविध कार्यक्रम साजरे केले जातात. आज शिवजयंती निमित्त शाळकरी विद्यार्थ्यांनी या परिसरात नृत्य करत पोवाडा गायले. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक केल्यानंतर शिव आरती गायण्यात आली. त्यानंतर शिवस्तुती ललकारी करण्यात आली. यावेळी लेफ्टनंट सौम्या हेमंत गुडधे आणि प्राचार्य अभय बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आज दिवसभर शहरातील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.