देशाच्या भवितव्यासाठी प्रत्येकानं मतदान करावं...; ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचं मतदारांना आवाहन - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 8:00 PM IST

सातारा Lok Sabha Election 2024 : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होत आहे. याआधी १९ एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान झालं. सशक्त लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रिया महत्वाची आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदार (Voter) हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. या निवडणुकीत प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं, यासाठी निवडणूक आयोग तसंच प्रशासन वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करत आहे. प्रत्येकानं मतदान करणं का आवश्यक आहे, हे पटवून दिलं जात आहे. याच अनुषंगानं ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे (Dr AH Salunkhe) यांनी 'देशाच्या आणि भावी पिढीच्या भवितव्यासाठी' प्रत्येकानं मतदान करावं, असं आवाहन केलंय.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.