सांगलीत महाविद्यालयीन युवतीवर पतीकडून चाकूहल्ला - युवती जखमी, पती फरार - Satara Crime - SATARA CRIME
🎬 Watch Now: Feature Video


Published : Aug 7, 2024, 2:32 PM IST
सांगली Satara Crime: एका महाविद्यालयीन विवाहित युवतीवर तिच्या पतीनंच चाकू हल्ला केल्याची घटना घडली. शहरातील कॉलेज कॉर्नर येथे हा प्रकार घडला. प्रांजल काळे असं विवाहितेचं नाव असून सहा महिन्यापूर्वी संग्राम शिंदे याच्याशी तिचा प्रेमविवाह झाला. चाकूहल्ल्याच्या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांसह अप्पर पोलीस अधीक्षिका रितू खोकर आणि शहर पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रांजल काळे ही विवाहित तरुणी एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. आज सकाळी ती गावाहून कॉलेजसाठी आली असता संग्राम शिंदेनं तिच्यावर चाकूनं हल्ला केला. ती जखमी झाली. तिला प्राथमिक उपचारासाठी मिरेजच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरू आहे. संशयित हल्लेखोर संग्राम शिंदे यांच्या शोधासाठी पथक तयार करून ते रवाना करण्यात आले आहे. लवकरच संशयित हल्लेखोराला ताब्यात घेऊ, असं शहर पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितलं आहे.