धार्मिक स्थळावर कारवाई करणार असल्याची अफवा, पोलिसांकडून पुणेकरांना शांततेचं आवाहन - Rumors of Kasbapeth religious place
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 9, 2024, 2:44 PM IST
पुणे Rumors of Kasbapeth religious place : कसबापेठ येथील धार्मिक स्थळावर कारवाई करणार असल्याची अफवा मध्यरात्री पसरली. त्यामुळं परिसरात मोठी गर्दी जमा होऊन शहरात वातावरण तापलं होतं. त्यावर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या भागात कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तसंच परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली आहे. शहरातील कसबा पेठ परिसरात असलेल्या धार्मिक स्थळाच्या बांधकामाबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. अनधिकृत बांधकामावर शनिवारी कारवाई करण्यात येणार असल्याची अफवा शहरात पसरली. त्यामुळं नागरिक मोठ्या संख्येनं या परिसरात जमा झाले होते. या घटनेची तत्काळ दखल घेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणी अफवा पसरवल्यास त्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.