आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू; ऑनलाईन अर्ज भरताना पालकांनी 'ही' चूक करू नये - RTE Admission
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 18, 2024, 2:30 PM IST
पुणे RTE Admission Process Started : गेल्या काही दिवसांपासून शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत (आरटीई) देण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. परंतु आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे. मागच्यावेळी या प्रवेश प्रक्रियेसाठी तब्बल 2 लाख 11 हजार अर्ज आले होते. त्यापैकी 68 हजार विद्यार्थी पात्र ठरले होते. पालकांनी कन्फर्म केलेल्या शाळेत जिल्हा परिषदेच्या शाळा, शासकीय शाळांचा समावेश होता. पण आता ती प्रक्रिया रद्द झाल्यानं, यापुर्वी अर्ज भरलेल्या पालकांनीही आता नव्यानं आपल्या पाल्यांचा अर्ज भरावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आरटीई ची प्रवेश प्रक्रिया करताना ऑनलाईन अर्ज कसा भरावा?, त्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत? एकूणच आरटीई प्रवेश प्रक्रियेचा ऑनलाईन अर्ज भरताना कोणत्या गोष्टी कराव्या, हे आपण जाणून घेऊया.