पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षाचालकांनी का काढला आक्रोश मोर्चा? 'या' आहेत त्यांच्या मागण्या - Rickshaw drivers march in Pimpri - RICKSHAW DRIVERS MARCH IN PIMPRI
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 11, 2024, 8:13 PM IST
पिंपरी-चिंचवड (पुणे) Rickshaw drivers march in Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या असंघटित कामगार विभागाच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहरातून 10 ऑगस्टला भव्य रिक्षाचालकांचा मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी असंघटित कामगारांच्या माध्यमातून कामगार नेते काशिनाथ नखाते तसंच अनेक रिक्षाचालक आंदोलनात सहभागी झाले होते. निगडीतील भक्ती शक्ती चौक ते पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून मोर्चाची सांगता करण्यात आली. या रिक्षा निषेध रॅलीत साडेसहाशे रिक्षाचालक सहभागी झाले होते. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले, "रिक्षा चालकांचं महामंडळ त्वरीत कार्यान्वित करा. रिक्षा चालकांना सामाजिक सुरक्षा सरकारनं द्यावी. तसंच अपघाती विमा संरक्षण, खूले परमीट बंद करण्याची मागणी करत त्यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये भव्य ‘रिक्षा चालकांच्या आक्रोश मोर्चा’ नेतृत्व केलं.