कोणी धंदा देता का धंदा...! रिक्षा जास्त झाल्यानं रिक्षा चालकच प्रवाशांच्या प्रतीक्षेत - Rickshaw driver - RICKSHAW DRIVER
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 25, 2024, 10:26 PM IST
पुणे Rickshaw Driver Issue : पुणे शहराला संस्कृती तसंच शैक्षणिक राजधानी म्हटल जातं. पण याच पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडीची अनेक कारणं जरी असले तरी शहारत वाढत असलेली वाहनांची क्षमता हे देखील याला कारणीभूत असल्याचं सांगितल जातंय. आता तर स्वतःहून रिक्षा चालक रिक्षामुळंच शहरात वाहतूक कोंडी होत असल्याचं सांगत असून शहरात मोठ्या प्रमाणात रिक्षा झाल्यानं आमच्या व्यवसायावर परिणाम झालं असल्याचं रिक्षाचालक सांगत आहे. सरकारनं सुरु केलेले रिक्षा परवाने आता बंद करावे अशी मागणी या रिक्षा चालकांच्या वतीनं करण्यात येत आहे. राज्यात परिवहन विभागाच्या वतीनं 2017 पासून रिक्षा परवाना खुले केलं असून मोठ्या संख्येनं नागरिकांनी यानंतर आपल्या नावावर रिक्षा परवाना घेतला आहे. 2017 पासून ते आत्ता पर्यंत 67 हजार रिक्षा रस्त्यावर आल्यानं शहरात परवानाधारक रिक्षा चालकांची संख्या ही जवळपास दीड लाखापर्यंत गेली आहे. एकीकडे ऑनलाईन व्यवसाय तर दुसरीकडे वाढलेली रिक्षा यामुळं रिक्षाचालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झालाय.