रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचं अंत्यदर्शन - RATAN TATA
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 10, 2024, 11:00 AM IST
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (RATAN TATA PASSED AWAY) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनानंतर उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. टाटा यांच्या निधनामुळं राज्यात आज (10 ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. टाटा समूहानं दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांचं पार्थिव आज दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स लॉनमध्ये सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.