लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत आरोप-प्रत्यारोप, रामदास कदम म्हणाले,... - RAMDAS KADAM News
🎬 Watch Now: Feature Video
शिर्डी Ramdas Kadam Lok Sabha Election Results : शिवसेना नेते (शिंदे गट) रामदास कदम यांनी बुधवारी (5 जून) शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देत रामदास कदम म्हणाले की, "मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनापासून धन्यवाद देईल. पक्षाला ज्या पंधरा जागा मिळाल्या होत्या, त्यातील आठ जागा निवडून आणल्या. सर्वात अगोदर भाजपाच्या जागा जाहीर करण्यात आल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनाही महिनाभरापूर्वी जागा जाहीर करायला मिळाल्या असत्या तर आज महाराष्ट्रातील चित्र वेगळं असतं", असा दावा त्यांनी केला. पुढं ते म्हणाले की, "एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. मात्र, त्याबद्दल कोणी बोलत नाही. उद्धव ठाकरे हे फक्त घरात बसून होते. कोरोना काळात सगळे नेते घराबाहेर पडले होते. कोरोनामुळं यांचाच जीव जाणार होता का?", असा खोचक सवालही त्यांनी उद्धव ठाकरेंना केला.