औक्षण, गळाभेट अन् खास गिफ्ट! पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंसह महादेव जानकरांना बांधली राखी; पाहा व्हिडिओ - Raksha Bandhan 2024 - RAKSHA BANDHAN 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 19, 2024, 8:14 PM IST
मुंबई Raksha Bandhan Celebration : देशभरात आज (19 ऑगस्ट) रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. भावा-बहिणींच्या नात्याचा हा सण राज्यातही उत्साहात साजरा केला जातो. राग, रुसवा दूर करत बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. सदैव सोबत राहण्याची प्रार्थना करते. तर भाऊदेखील आपल्या बहिणींचं रक्षण करण्याचं वचन तिला देतो. नात्यात दुरावा निर्माण होत असला तरी हा सण भावा-बहिणींना एकत्र आणतो. तर दरवर्षी सर्वसामान्यांच्या रक्षाबंधनापेक्षा राजकीय नेत्यांच्या रक्षाबंधनाकडं सर्वांचं लक्ष असतं. यावर्षी अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे रक्षाबंधनाच्या दिवशी एकत्र येणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर दुसरीकडं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या रक्षबंधनाचीदेखील चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि महादेव जानकर यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या लाडक्या बहिणीला छानसं गिफ्ट दिलं. तर शेवटी एकमेकांनी गळाभेट घेत एकमेकांच्या पायादेखील पडले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना महादेव जानकर म्हणाले, " राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र यावं." पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील रक्षाबंधन 12 वर्षांनंतर झाल्याची आठवणदेखील यावेळी जानकर यांनी आठवण करुन दिली.