Rahul Gandhi Rally : ठाकरेंच्या मैदानावर गांधींची सभा, इंडिया आघाडी प्रचाराचा नारळ फोडणार? - Dussehra gathering
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 17, 2024, 6:04 PM IST
मुंबई Rahul Gandhi Meeting : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा आज (17 मार्च) मुंबईतील शिवाजी पार्क येथे होत आहे. या सभेला इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. शनिवारी निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर आज इंडिया आघाडीची सगळ्यात मोठी सभा दादरच्या शिवाजी पार्क येथे होत आहे. या सभेच्या माध्यमातून इंडिया आघाडी अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची देखील चर्चा आहे.
निवडणुकांचं गणित बदललं : ठाकरे आणि दादर शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या सभा हे एक समीकरण बनलं होतं. दसऱ्याला होणारा शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा तर गुढीपाडव्याला होणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाडवा मेळावा. ठाकरे यांचे हे दोन्ही मेळावे नेहमीच दादरच्या शिवाजी पार्कवर होत आले आहेत. याच शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा निवडणुकांचं गणित बदललेलं आहे. आज याच ऐतिहासिक शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची सभा होणार आहे. या सभेला देशभरातून इंडिया आघाडीचे समर्थक दाखल होणार असल्याची माहिती काँग्रेसच्यावतीनं देण्यात आली आहे.