बाळासाहेब थोरातांच्या सुजय विखेंवरील 'त्या' टीकेला राधाकृष्ण विखेंचं प्रत्युत्तर, म्हणाले 'त्यांचा' भ्रम दूर करू - Radhakrishna Vikhe Patil
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर Radhakrishna Vikhe Patil : सुजय विखेंनी संगमनेर मधून निवडणूक लढवावी ही लोकांची भावना आहे. त्याचा आदर करायचा असतो. दुसरीकडे महायुतीत जागेबाबत जो निर्णय होईल तो निर्णय आपण मान्य करायचा असल्याचं महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.
थोरात यांचा भ्रम दूर करू - विखे पाटील : बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंचा निवडणूक लढविण्याचा हट्ट त्यांच्या पक्षानं अथवा वडिलांनी पुरवावा. सुजय विखेंचा निवडणूक लढवण्याचा धंदा असेल तर त्यांनी राहुरी आणि संगमनेर मधूनही निवडणूक लढवावी असं व्यक्त केलं होतं. यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलाचा हट्ट पुरवण्याचं काम वडिलांचं आहे. इतरांना त्याची चिंता करण्याचं कारण नाही; मात्र थोरात ज्या भ्रमात आहे तो लवकरच आम्ही दूर करू असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हटलय.